अभिनेत्री सना खान सर्वांना आठवतच असेल. दाक्षिणात्य सिनेमे आणि बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून काम करणाऱ्या सनाने अचानक अभिनय क्षेत्र सोडून अध्यात्माचा मार्ग धरला. तिचा हा निर्णय सर्वांसाठीच मोठा धक्का होता. चित्रपटांमध्ये अभिनय करत असणारी सना जेव्हा ‘बिग बॉस’मध्ये आली तेव्हा तिच्या लोकप्रियतेमध्ये आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली. करियरमध्ये चांगल्या पद्धतीने पुढे जात असतांनाच तिने लग्न करत हे क्षेत्र सोडण्याचे ठरवले.
असे असूनही सनाच्या लोकप्रियतेत आणि फॅन्समध्ये तिळमात्रही कमी आली नाहीये. इंडस्ट्री सोडूनही सना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच सनाने तिचा तिच्या नवऱ्यासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, ज्यात ती एअरपोर्टवर नमाज अदा करताना दिसते आहे. (sana khan offers namaz at the airport)
सध्या सना तिच्या नवऱ्यासोबत मालदीवमध्ये सुट्यांचा आनंद घेत असून, या सुट्यांमध्ये तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते आहे. तिने एक व्हिडिओ पोस्ट केला असून, कॅप्शनमध्ये तिने लिहिले, “आम्हाला प्रवास करण्याची संधी मिळाली आणि आम्ही निघालो. आम्ही एअरपोर्टवर आहोत. माझा नवरा आराम करत आहे तर मी व्हॅनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही नमाज चुकवू शकत नाही. नमाज चुकवणे चांगली गोष्ट नाही.”
दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती सी प्लेन, वेलकम ड्रिंकचा आनंद घेताना दिसते आहे. काही व्हिडिओमध्ये ती तिच्या नवऱ्यासोबत टेनिस खेळताना दिसत आहे, तर एका व्हिडिओमध्ये ती झोक्यावर झोके घेत आहे.
मागच्या वर्षी नोव्हेंबर २०२० मध्ये सना खानने अचानक सोशल मीडियावर तिच्या आणि अनसच्या लग्नाची आनंदाची बातमी दिली होती. तिच्या लग्नाच्या बातमीमुळे सर्वच जणं आश्चर्यचकित झाले होते. सनाने तिच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-काय सांगता ‘जेह’ सैफ करीनाच्या मुलाचे खरे नाव नाही? मग काय आहे त्याचे नाव? जाणून घ्या
-अभिनव शुक्ला ‘या’ आजाराने आहे ग्रस्त, तर आजार स्वीकारण्यास लागली तब्बल २० वर्षे