Friday, March 13, 2026
Home कॅलेंडर ड्रग्स केस मधून जामीन मिळाल्यावर सैंडलवुड अभिनेत्रीने सोशल मीडियावर अशी वापसी

ड्रग्स केस मधून जामीन मिळाल्यावर सैंडलवुड अभिनेत्रीने सोशल मीडियावर अशी वापसी

सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. त्याचमुळे सुशांतच्या आत्महत्येचा तपास सुरु झाला. सुशांतच्या मृत्यू हत्या की आत्महत्या आहे हे शोधण्यासाठी या मृत्यूची चौकशी सुरु झाली. त्यातच पोलिसांना अनेक धागेदोरे सापडायला लागले. यातलाच एक महत्वाचा मुद्दा होता ड्रग्सचा. जसा ड्रग्सचा मुद्दे समोर आला तसतशी अनेक मोठी नावं यात अडकायला लागली. अगदी दिपीकापासून ते सारा अली खान पर्यंत अनेक नावं याप्रकरणात अडकली गेली. हे ड्रग्स प्रकरण फक्त बॉलिवूड पुरते मर्यादित नव्हते तर ते संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टी यात अडकली होती.

याच ड्रग्स प्रकरणात सैंडलवुड म्हणजेच कर्नाटक चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री संजना गिलराणी हिचा देखील समावेश होता. संजनाला कर्नाटकमध्ये अनेक पार्ट्यांमध्ये ड्रग्स पुरवल्याबद्दल ८ सप्टेंबर २०२०ला अटक करण्यात आली होती. जवळपास ९३ दिवस जेलमध्ये राहून संजनाला १२ डिसेंबर २०२० ला आरोग्य संबंधित तक्रारींच्या कारणावरून जामीन मंजूर झाला होता.

जेलमधून बाहेर आल्यावर जवळपास २३ दिवसांनी संजना तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पुन्हा सक्रिय झाली आहे. संजनाने तिच्या अकाऊंटवरून एका धन्यवादाची पोस्ट टाकत, लवकरच सोशल मीडियावर येणार असल्याचे सांगितले आहे. संजनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ” त्या सर्व लोकांना खूप खूप प्रेम ज्यांनी मला माझ्या अकाऊंटच्या मेसेज बॉक्समध्ये मेसेज केले. मी सर्वांचं एक एक मेसेज वाचले आहे. माझ्या एक मिलियन परिवाराने केलेल्या माझ्या काळजीसाठी आणि प्रार्थनासठी मी तुमची खूप आभारी आहे. मी माझी तब्येत ठीक झाली की लाव्कच पुन्हा सोशल मीडियावर येणार आहे. तुम्ही सर्वानी दाखवलेल्या प्रेमामाबद्दल तुम्हाला धन्यवाद देखील म्हणू शकत नाही, खासकरून माझे कुटुंब, मित्र परिवार आणि माझे फॉलोवर्स.”

तत्पूर्वी संजनाला कर्नाटक हायकोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. जस्टिस श्रीनिवास हरीश कुमार यांनी 3 लाख रुपयांच्या दोन खाजगी जात मुचलक्यावर संजनाला जामीन मजूर केला आहे. शिवाय तिला महिन्यातून दोनदा हजेरी देण्यासाठी जावे लागणार असून तपासात संपूर्ण सहयोग करावा लागणार आहे.

संजनाने २००५ साली तेलगू चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. तिने आतापर्यंत तामिळ, तेलगू, कन्नडा, मल्याळम भाषेतील सिनेमात काम केले आहे.

हे देखील वाचा