भारीच ना! पुन्हा घडणार शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचे दर्शन, रवी जाधव यांनी केली ‘बाल शिवाजी’ची घोषणा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंतीनिमित्त इरॉस इंटरनॅशनल, आनंद पंडित मोशन पिक्चर्स, संदीप सिंग यांच्या लीजंड स्टुडिओसह ‘बाल शिवाजी’ चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचा टीझर शनिवारी (१९ फेब्रुवारी) प्रदर्शित झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) ‘बाल शिवाजी’चे दिग्दर्शन करणार आहेत.

हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणातील न ऐकलेल्या शौर्याच्या घटनांवर आधारित असेल. या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या १२व्या ते १६व्या वर्षातील तरुणाईचा टप्पा दाखवण्यात येणार आहे. येत्या जून २०२० पासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. याबद्दल बोलताना दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले, “चित्रपटात मला काय दाखवायचे आहे, यावर संशोधन करण्यासाठी आठ वर्षे लागली आहेत.” २०१५ पासून या विषयावर चित्रपट बनवण्याची इच्छा असल्याचे जाधव यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, “मी गेल्या वर्षी संदीप सिंगला भेटलो आणि त्याला या कथेचे महत्त्व समजले. शेवटी, शिवाजी महाराज हे भारतातील महान राज्यांपैकी एक होते.” (sandeep singh teams up with national award winning director ravi jadhav for magnum opus bal shivaji)

या चित्रपटाबद्दल बोलताना संदीप सिंग म्हणाले, “मला नेहमीच ऐतिहासिक चित्रपट बनवायचा होता. म्हणून जेव्हा रवीने या विषयी माझ्याशी संपर्क साधला, तेव्हा मी लगेच होकार दिला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान व्यक्तिमत्त्वावर आपण चित्रपट बनवत आहोत, ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.”

जेव्हापासून ‘बाल शिवाजी’ चित्रपटाची घोषणा झाली, तेव्हापासून चाहत्यांमध्ये याबद्दल आनंद आणि उत्सुकता पाहायला मिळत आहे. आजपर्यंत शिवाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवणारे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता रवी जाधव यांचा ‘बाल शिवाजी’ हा चित्रपट कायतरी नवीन घेऊन येणार हे नक्कीच!

हेही वाचा-