Thursday, May 1, 2025
Home बॉलीवूड संगीता घोष यांनी वयाच्या दहाव्या वर्षी केली करिअरला सुरुवात, ‘या’ नावाने आहे घराघरात प्रसिद्ध

संगीता घोष यांनी वयाच्या दहाव्या वर्षी केली करिअरला सुरुवात, ‘या’ नावाने आहे घराघरात प्रसिद्ध

आजपर्यंत टीव्ही दुनियेतील खूप कलाकार आहेत जे त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करुन जातात. जसे की एखाद्या मालिकेत एखादी भूमिका खूप गाजते आणि प्रेक्षक त्याच भूमिकेला लक्षात ठेवतात आणि त्यामुळे त्यांना प्रसिध्दी मिळते. तसेच संगिता घोष ही टीव्ही दुनियेतील ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. तिने तिची कारकिर्दीने टीव्ही दुनियेत ओळख निर्मान केली आहे, आणि आता तिला कोणाच्याही ओळखीची गरज पडत नाही.

तिने आपल्या करिअरची सुरुवात, 10 वर्षाची असताना ऋषीकेश मुखर्जी यांच्यासोबत दुरदर्शनवर काम करत केले होते, पण तिला फार काही यश मिळाले नाही. पण जेव्हा तिने ‘जिस देश में निकला होगा चाॅंद’ ही सिरियल केली तेव्हा लोक तिला परमिंदर कौर या नावाने ओळखू लागले. या सिरियल मधला परमिंदर कौर ही भुमिका खूपच गाजली होती. आजही तिला लोक ‘परमिंदर कौर’ या नावाने ओळखतात. आज संगिता आपला 46 वा वाढदिवस साजरी करत आहे तर आपण जाणून घेउया तिच्या जीवनातील काही मजेशीर गोष्टी.

संगिताचा जन्म 18 ऑगस्ट 1976 ला झाला होता. ती टीव्ही अभिनेत्रीसोबतच मॉडेलही आहे. 1996 मध्ये तिने कॉलेजचे शिक्षण पुर्ण केले आणि नंतर तिने कुरुक्षेत्र, अधिकारिका, अजैब दास्तान आणि दरारा यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. यासोबतच तिने डोनालर सूटिंग आणि निरमा सारख्या ब्रॅंडसाठी मॉडलिंग केली आहे. आणखी तिने ‘मेहंदी तेरे नामकी’, ‘केहता हैं दिल जी ले जरा’ आणि नचबलिए यासारख्या कार्यक्रमातही काम केले होते.

संगिता घोष यांनी राजस्थानचे पोलो प्लेयर ओळखले जाणारे शैलेंन्द्र सिंह राठौर यांच्यासोबत लग्न केले. या दोघांची ओळख जयपुरमध्ये घोडेस्वारी शिकताना झाली होती. तेव्हा शैलेन्द्र हेच तिला घोडेस्वारी शिकवत होते आणि यामुळे दोघांच्या खूपवेळा भेटी गाठी झाल्या आणि यामध्येच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्न करण्याचा निर्णय केला. पण त्यावेळेस तिच्या वडिलाची तब्येत खूपच खराब असल्याने त्या दोघांनी अतिशय साध्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय केला.

संगिता घोष ( Sangita Ghosh ) तिच्या लग्नानंतरच्या आयुष्यामध्ये खूपच खुश आहे आणि आता ती एका मुलीची आई आहे. पण तिने आई झाल्याचा खुलासा 7 महीन्यांनंतर केला होता. संगिताच्या मुलीचा जन्म गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये झाला होता, पण तिची मुलगी प्रिमेच्युअर असल्यामुळे तिलास 15 दिव आयसीयू मध्ये ठेवले होते. आणि याच्याआधि तिचा गर्भपात झाला होता त्यामुळे ती खूप घाबरली होती आणि म्हणूनच तिने मुलगी झल्याचा खुलासा उशीरा केला होता. संगिता घोष सध्या आपल्या करिअर ध्यान देत आहे. ती सध्या सुवर्ण घर या मालिकेणध्ये काम करत आहे, या मालिकेमध्ये ती आई ची भुमिका साकारत आहे. या मालिकेय्या शूटींगमुळे ती फार व्यस्त असते.

हेही वाचा-
यशराज बॅनरमधून धमाकेदार पदार्पण करूनही ‘ही’ अभिनेत्री ठरली फ्लॉप, सहाय्यक भूमिकांनीही दिली नाही साथ
प्रतिभावान अभिनेता असूनही रणवीर शोरीच्या वाट्याला आल्या कायम सहाय्यक भूमिका, पण वैयक्तिक आयुष्यामुळे मिळाली जास्त प्रसिद्धी

हे देखील वाचा