Thursday, March 28, 2024

‘या’ कारणामुळे फिके पडतायत बॉलिवूड चित्रपट, संजय दत्तने केला खुलासा

सध्या चित्रपटगृहात एकापाठोपाठ एक दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. ‘बाहुबली’, ‘पुष्पा’, ‘आरआरआर’ आणि आता ‘केजीएफ २’ चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सर्वत्र दाक्षिणात्य अभिनेत्यांचे आणि त्यांच्या चित्रपटांचे कौतुक होताना दिसत आहे. सध्या सिनेमागृहात सुपरस्टार यशच्या ‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपटाने कमाईचे नवनवीन रेकॉर्ड करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूड चित्रपटांची चर्चा कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावरच अभिनेता संजय दत्तने  (Sanjay Dutt) परखड मत व्यक्त केले आहे. 

अभिनेता संजय दत्त सध्या ‘केजीएफ २’ मध्ये  महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात त्याने ‘अधीरा’ची भूमिका साकारली होती. ‘अधीरा’च्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्यामध्ये सध्या संजय दत्तच्या या दमदार अभिनयाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. तसेच सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. त्यामुळे सगळीकडे या दमदार ऍक्शनमुळेच साउथचे चित्रपट यशस्वी होतात का? असा प्रश्न उभा राहिला आहे. ज्यावर आता अभिनेता संजय दत्तने प्रतिक्रिया दिली आहे.

याबद्दल बोलताना संजय दत्त म्हणाला की  “मला वाटतं हिंदी चित्रपटसृष्टी वीरता किंवा धैर्य विसरत आहे, तर दक्षिणेकडील चित्रपट निर्माते हे विसरलेले नाहीत. मला असे म्हणायचे नाही की, स्लाईस ऑफ लाइफ सिनेमे किंवा रोम-कॉम वाईट आहेत. परंतु आपण यूपी, बिहार, झारखंड, राजस्थानमधील प्रेक्षक का विसरलो आहोत. राजामौलींचेच उदाहरण द्यायचे झाल्यास, ते आपल्या कामावर जास्त विश्वास ठेवतात. आपल्याकडे असे आधी दिग्दर्शक होते मात्र आता नाहीत. याचाही बॉलिवूडवर परिणाम झाला आहे.”

दरम्यान ‘केजीएफ चॅप्टर २’ १४ एप्रिल रोजी जगभरातील १०,००० स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. पहिल्या दिवशी ५०,००० हून अधिक शो दाखवले गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल जात आहेत, त्यामुळे चित्रपटाची कमाई चांगली होत आहे. या चित्रपटात संजय दत्तसोबत रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज, जॉन कोकेन आणि सरन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा