Friday, August 1, 2025
Home कॅलेंडर ‘या’ अभिनेत्रीला बघातच प्रेमात पडला होता संजय दत्त, अशी होती त्याची पहिली ‘लव्ह स्टोरी’

‘या’ अभिनेत्रीला बघातच प्रेमात पडला होता संजय दत्त, अशी होती त्याची पहिली ‘लव्ह स्टोरी’

संजय दत्त बॉलीवूड मधील एका मोठे नाव. संजय जितका त्याच्या अभिनयासाठी, चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे तितकाच किंबहुना जास्त त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल प्रसिद्ध आहे. संजय आता त्याच्या जीवनात स्थिर झाला आहे. संजयची पहिली पत्नी रिचा शर्मा हिची आज पुण्यतिथी. रिचाचे वयाच्या केवळ ३२ व्या वर्षी १९१६ मध्ये कॅन्सरने निधन झाले.

रिचाचा जन्म ६ ऑगस्ट १९६३ मध्ये झाला. रिचा बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी मुंबईत आली. देव आनंद यांच्या चित्रपटात रिचाला वय कमी असल्यामुळे काम मिळू शकले नाही. मात्र देव आनंद यांनी तीला त्यांच्या पुढच्याच ‘हम नौजवान’ या सिनेमात अभिनयाची संधी दिली. त्यानंतर रिचाने काही चित्रपटात काम केले मात्र तिला पाहिजे तेवढे यश मिळाले नाही. असं म्हणतात संजय दत्तने रिचाचा फोटो एका स्थानिक मासिकात पाहिला आणि पाहताचक्षणी तो तिच्या प्रेमात पडला. ‘आग ही आग’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान संजयने रिचाला लग्नासाठी विचारले. पुढील काहीच दिवसात १९८७ मध्ये त्यांनी लग्न केले, आणि १९८८ मध्ये त्यांच्या त्रिशाला मुलीचा जन्म झाला.

सर्व सुरळीत चालू असतांना अचानक रिचाला ब्रेनट्युमर असल्याचे समजले आणि ती उपचारासाठी न्यूयॉर्कला गेली. पुढे काही काळ संजय नियमित तिला भेटायला अमेरिकेला जात होता. मात्र तो जस जसा चित्रपटनमध्ये व्यस्त झाला तसं तसे त्याचे रिचाला भेटायला जाणे कमी झाले. काही दिवसांनी संजय आणि माधुरीच्या नात्याबद्दल चर्चा सुरु झाल्या. असं म्हणतात तेव्हा संजय रिचाला विसरून पूर्णपणे माधुरीच्या प्रेमात होता. जेव्हा रिचा बारी झाली तेव्हा ती नवीन आयुष्य सुरु करण्याच्या विचाराने पुन्हा भारतात आली. मात्र तोपर्यंत संजय रिचाला पूर्णपणे विसरून पुढे गेला होता. रिचाला याची जाणीव झाल्याने ती पुढच्या १५ दिवसातच न्यूयॉर्कला परत गेली. तिथे गेल्याच्या काही दिवसांनंतर रिचाला पुन्हा ट्युमर झाला आणि ती १० डिसेंबर १९९६ ला हे जग सोडून गेली.

हे देखील वाचा