Saturday, March 15, 2025
Home बॉलीवूड Video | संजय दत्तच्या ‘जबरा फॅन’ आहेत आजीबाई, अभिनेत्याला भेटताच दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

Video | संजय दत्तच्या ‘जबरा फॅन’ आहेत आजीबाई, अभिनेत्याला भेटताच दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

हिंदी चित्रपट जगतातील अभिनेते आणि त्यांची लोकप्रियता याबद्दलचे अनेक किस्से नेहमीच ऐकायला मिळत असतात. आपल्या आवडत्या अभिनेत्याला एकदा तरी भेटता यावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या लाडक्या चाहत्याला भेटण्यासाठी त्याची एक झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहते काहीही करायला तयार असतात. सध्या लोकप्रिय अभिनेता संजय दत्तला (Sanjay Dutt) भेटण्यासाठी आलेल्या एका आजींचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये संजू बाबाला भेटून आजींच्या चेहऱ्यावर झालेला आनंद स्पष्टपणे दिसत आहे. सध्या या व्हायरल व्हिडिओची सर्वत्र चर्चा होत आहे. 

संजय दत्त हा हिंदी चित्रपट जगतातील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक दशके त्याने चित्रपट जगतात आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. त्यामुळेच त्याचे चाहते त्याची एक झलक पाहायला नेहमीच उत्सुक असतात. याचीच प्रचिती अलिकडेच आली आहे. संजय दत्तचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे, ज्यामध्ये त्याच्या घरासमोर चाहत्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. अभिनेत्याला भेटण्यासाठी चाहते खूप उत्सुक दिसत आहेत. हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानी यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. ज्यामध्ये संजय दत्तच्या घरासमोर चाहत्यांची गर्दी पाहायला मिळते. त्याचवेळी संजय दत्त घराच्या गेटमध्ये त्याच्या चाहत्यांना भेटताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये संजय दत्तची एक वयस्कर चाहती देखील दिसत आहे, जी संजय दत्तला पाहण्यासाठी आली आहे. संंजय दत्तला पाहण्यासाठी आलेल्या या आजीबाईंच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा आहे. त्यामुळेच आपल्या लाडक्या अभिनेत्याला पाहण्यासाठी त्या मुंबईला आल्या आहेत. या आजीबाईंनी संजू बाबाला भेटताच माझे स्वप्न पूर्ण झाले अशा शब्दात आपला आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान संजय दत्त लवकरच ‘केजीएफ चॅप्टर २’ मध्ये झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात संजय दत्त पुन्हा एकदा खलनायकाच्या (अधीरा) भूमिकेत दिसणार आहे. ‘केजीएफ चॅप्टर २’मध्ये संजय दत्त सोबत, सुपरस्टार यश, रवीना टंडन आणि श्रीनिधी शेट्टी देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १४ एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार असल्याने संजय दत्तचे चाहते खूप उत्सुक आहेत. ‘सडक २’ नंतर संजय दत्त ‘केजीएफ चॅप्टर २’ मध्ये दिसणार आहे. त्यामुळेच संजय दत्त सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

 

हे देखील वाचा