बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्त यांची मोठी मुलगी त्रिशाला दत्तने नीतू कपूर यांच्यासोबतचा तिच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. तिने पहिल्यांदाच तिच्या चाहत्यांसाठी असा फोटो शेअर केला आहे, जो यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. हा एक जुना फोटो असून, यात त्रिशाला दत्त नीतू कपूर यांच्या गळ्यात हात टाकून हसताना दिसत आहे. फोटोत त्रिशाला आनंदाने नीतू यांच्याजवळ बसली असून, दोघी कॅमेराकडे पाहून हसत आहेत. त्रिशालाने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला असून, तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘मला काय मिळाले ते पहा, लव्ह यू नीतू कपूर’ यासोबतच त्रिशालाने हार्ट इमोजी देखील बनवले आहे.

नीतू कपूर यांनी ही स्टोरी रिपोस्ट केली आहे आणि लिहिले की, ‘मला त्रिशालावर गर्व आहे. खूप सुंदर.’ यासोबतच नीतू यांनी देखील त्रिशालासाठी हार्ट इमोजी आणि प्रेम दिले. नीतू कपूर यांनी लिहिले की, ‘त्रिशालाने क्षेत्राबाहेरचे करिअर निवडले आहे.’
विशेष म्हणजे, त्रिशाला व्यवसायाने साइकोथेरेपिस्ट आहे आणि अमेरिकेत काम करते. ती अनेकदा तिच्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मानसिक आरोग्याविषयी बोलत असते. या व्यतिरिक्त, ती आस्क मी एनीथिंग हे देखील आयोजित करते, ज्यामध्ये ती लोकांना मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांविषयी जागरूक करत असते. याशिवाय ती तिचे वैयक्तिक अनुभवही इन्स्टाग्रामद्वारे शेअर करते.
त्रिशाला ही संजय दत्त आणि ऋचा शर्मा यांची मुलगी आहे. संजय आणि ऋचा यांनी १९८७ मध्ये लग्न केले होते. ब्रेन ट्यूमरमुळे १९९६ मध्ये रिचा शर्माचा मृत्यू झाला. आता संजय दत्तने मान्यतासोबत २००८ मध्ये लग्न केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बीच बॉम्ब’ मीरा राजपूतने शेअर केला तिचा ग्लॅमरस, मादक बिकिनी फोटो
-कार्तिक आर्यन नेटफ्लिक्सवर करणार जबरदस्त ‘धमाका’, ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे