Friday, July 5, 2024

‘माझा हात पकडण्याऐवजी…’, मुलगी शनाया कपूरच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी संजय कपूरची मोठी प्रतिक्रिया

अभिनेता संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूर, करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची तयारी करत आहेत. करण जोहर गेल्या काही वर्षांत, दिग्दर्शक किंवा निर्मात्यापेक्षा जास्त, कलाकारांच्या मुलांना बॉलिवूडमध्ये आणल्यामुळे अधिक प्रसिद्ध झाला आहे. त्याने आलिया भट्ट, वरुण धवन, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, करण जोहर आता संजय कपूरची मुलगी शनाया कपूरला लाँच केले आहे. आता मुलीबद्दल बोलताना संजय कपूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना संजय कपूर म्हणाले की, ‘मी नेहमीच शनायाच्या बाजूने उभा राहील, परंतु शनायाने आपल्या चुका व अनुभवावरून शिकावे अशी माझी इच्छा आहे.’

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘तिला बर्‍याच काळापासून अभिनेत्री व्हायचं आहे. तिला तिच्या अनुभवावरून शिकण्याची गरज आहे. तिला माहित आहे की, मी नेहमीच तिच्या पाठीशी उभा राहीन, आणि तिचे समर्थन करेन. खरं सांगायचं तर मला असं वाटतं की, प्रत्येक माणसाने त्याच्या स्वत: च्या मेहनातीवर पुढे गेले पाहिजे. आपल्या चुका आणि अनुभवावरून त्याने शिकले पाहिजे. अशाप्रकारे, सर्व गोष्टींसाठी माझा हात पकडण्याऐवजी ती तिच्या प्रवासाचा आनंद अधिक घेईल.’

अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत महीप कपूर यांनी सांगितले की, शनायाला इंटीमेट सीन करताना बघून वडील संजय कपूर यांची प्रतिक्रिया काय असेल. यावर त्यांनी सांगितले की, ‘जरी संजयला धक्का बसेल, परंतु तो आपल्या मुलीच्या कारकीर्दीत हस्तक्षेप करणार नाही. संजयला आतून नक्कीच जाणवेल की, देवा, मी काय पहात आहे, पण जर ती कामाची गोष्ट असेल, तर तो काही बोलणार नाही.’

करण जोहरने आपल्या प्रॉडक्शन हाऊसबरोबर स्वतःची टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सी सुरू केली आहे. त्याअंतर्गत तो शनायाला आपल्या चित्रपटात लाँच करणार आहे. या जुलैपासून शनाया तिच्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. मात्र, करणने या चित्रपटाविषयी फारशी माहिती दिली नाही. करण जोहरनेही शनाया कपूरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. हा व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर चाहते तिच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘वडिलांनाच मानले होते बॉयफ्रेंड’, नीना गुप्ता यांनी केला वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा

-खुशी कपूर झाली घराबाहेर स्पॉट अन् सगळीकडे होऊ लागली तिच्या वॉलपेपरची चर्चा, पाहून तुम्हीही व्हाल भावुक

-दगडाने संगीत वाजवत मुलाने ट्रेनमध्ये गायलं अरिजित सिंगचं गाणं; पाहा मन जिंकणारा व्हिडिओ

हे देखील वाचा