Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड ऐश्वर्या रॉयचे लग्न पाहण्यासाठी ‘या’ अभिनेत्याने वापरली होती दुर्बीण, झाला ‘त्या’ घटनेचा खुलासा

ऐश्वर्या रॉयचे लग्न पाहण्यासाठी ‘या’ अभिनेत्याने वापरली होती दुर्बीण, झाला ‘त्या’ घटनेचा खुलासा

बच्चन कुटूंबाची लाडकी सूनबाई म्हणजेच ऐश्वर्या राय बच्चन आपल्या स्टायलिश राहणीमानासाठी प्रसिद्ध आहे. ऐश्वर्याच्या महागड्या साड्यांची, दागिन्यांची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत असते. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनच्या लग्नाचीही जोरजार चर्चा त्या काळात रंगली होती. मात्र तुम्हालाही ऐकून धक्का बसेल की हा विवाह सोहळा पाहण्यासाठी एका अभिनेत्याने चक्क दुर्बिणीचा वापर केला होता काय होता तो किस्सा, चला जाणून घेऊ.

मिसवर्ल्ड ऐश्वर्या रायच्या (aishwarya roy) सौंदर्याच्या जादूने ९० च्या दशकात अवघी सिनेसृष्टी घायाळ झाली होती. त्या काळात प्रत्येक अभिनेता ऐश्वर्याच्या प्रेमात पडला होता. म्हणूनच ऐश्वर्याचं नाव अनेक बॉलिवूड कलाकारांशी जोडले गेले होते. अगदी सुपरस्टार सलमान खानपासून विवेक ऑबेरॉयपर्यंत अनेकजण ऐश्वर्यासाठी वेडे झाले होते. मात्र शेवटी तिच्या लग्नाची माळ मात्र अभिषेक बच्चनच्या गळ्यात पडली. 2007 मध्ये झालेल्या या विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा रंगली होती. अनेक मोठमोठे कलाकार या लग्नाला उपस्थित राहिले होते. मात्र एका बॉलिवूड कलाकाराने तर ऐश्वर्याला पाहण्यासाठी चक्क दुर्बिणीचा वापर केला होता.

हा संपूर्ण किस्सा अर्जुन कपूर यांचे काका संजय कपूर यांच्याशी संबधित आहे. ते ऐश्वर्याचे इतके मोठे चाहते होते की, त्यांनी तिच्या लग्नात ऐश्वर्याला पाहण्यासाठी चक्क दुर्बिणीचा वापर केला होता. या घटनेचा खुलासा खुद्द अर्जुन कपूरने एका कार्यक्रमात केला होता. यावेळी अर्जुनने सांगितले की, त्याचे काका संजय कपूर आणि त्यांची पत्नी महीप कपूरने ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनचा विवाह सोहळा पाहण्यासाठी दुर्बिणीचा वापर केला होता. यावेळी त्यांनी या लग्नाचा थाटमाट आणि आलेल्या पाहुण्यांना पाहिले होते. त्याचबरोबर कौतुकाने टाळ्याही वाजवल्या होत्या. यावेळी त्यांच्याकडे फक्त एकच दुर्बीण होती. दुसरी दुर्बीण अर्जुनच्या घरी राहिली होती जी त्याला आणायला लावल्यानंतर या सगळया प्रकरणाचा उलगडा झाला होता.

दरम्यान 2007 मध्ये झालेला ऐश्वर्या आणि अभिषेकचा विवाह सोहळा आतपर्यंतचा महागडा विवाह सोहळा मानला जातो. या लग्नात ऐश्वर्याने तब्बल 75 लाखाची साडी घातल्याची ही बातमी समोर आली होती.

हेही वाचा :

हे देखील वाचा