Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड मीडियासमोर एका महिला कर्मचाऱ्यावर खेकसले भन्साळी, चुक लक्षात येताच करू लागले ‘हे’ काम

मीडियासमोर एका महिला कर्मचाऱ्यावर खेकसले भन्साळी, चुक लक्षात येताच करू लागले ‘हे’ काम

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. त्यांच्या चित्रपटाने विशेष गल्ला जमवला नसला, तरी चित्रपटाची कथा आणि मांडणी प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे. यासाठी संजय लीला भन्साळी यांचे कौतुक होताना दिसत आहे. त्यांनी एका कणखर आणि जिद्दी महिलेची कथा जगासमोर आणून त्यांचा सन्मान केल्याचीच सध्या चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र चित्रपटातून महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारणाऱ्या संजय लीला भन्साळी यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते एका महिला कर्मचाऱ्यावर ओरडताना दिसत आहेत. काय आहे हा सगळा प्रकार चला जाणून घेऊ.

‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाला अपेक्षित यश न मिळाल्याने सध्या संजय लीला भन्साळी खूपच बिघडल्याचे दिसत आहे. चित्रपटाची कथा, मांडणी सगळ्याच बाबतीत खूप चर्चा झाली होती. चित्रपटातील आलिया भट्टच्या (Alia Bhatt) भूमिकेचेही कौतुक झाले होते. मात्र चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ते खूपच निराश झाले आहेत. मात्र याबद्दल ते माध्यमांसमोर मात्र सगळ काही ठिक असल्याचे दाखवत आहेत. त्यांना स्वतः बोलावून मुलाखती देताना दिसत आहेत. त्यांच्या याच वागण्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीचा एक किस्सा सध्या सगळीकडे चर्चेत आहे. ज्यामध्ये ते महिला सहकाऱ्यावर विनाकारण ओरडताना दिसले होते.

हा सगळा प्रकार मुंबईमध्ये एका हॉटेलमध्ये घडला होता, ज्या ठिकाणी संजय लीला भन्साळी यांना पत्रकार परिषद घेण्यासाठी बोलावले होते. यावेळी मुलाखत घेण्याआधी संजय लीला भन्साळी खूपच संतापले होते. त्यांना या मुलाखतीत कसलाच रस नाही, असेच ते दाखवत होते. मात्र त्यांना ही मुलाखतही द्यायची होती. पहिली मुलाखत पुर्ण होताच त्यांनी पुढे मुलाखत देणार नसल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतरही त्यांनी मुलाखत दिली, ज्यामध्ये ते एका महिला सहकाऱ्यावर ओरडताना दिसत आहेत.

हा संपुर्ण किस्सा असा आहे की, मुलाखत सुरू होण्याआधीच संजय लीला भन्साळी यांनी वेळ निश्चित केली होती. ती झाल्यानंतर एक महिला कर्मचारी सुचना करणार असे ठरले होते. या सुचनेनुसार या कर्मचाऱ्याने सुचना केली, मात्र मुलाखत ऐन रंगात आली असताना मध्येच थांबवणे त्यांना आवडले नाही. त्यामुळे ते रागाने ओरडताना दिसले. “माझा सगळा मुड खराब केला”, असे म्हणत रागाने दुसरीकडे जाऊन बसले. मात्र काही वेळाने त्यांना आपली चुक लक्षात आल्यानंतर, ते या घटनेचे फुटेज हटवायला लागले. मात्र त्यांच्या या वागण्यावर सगळ्यांनीच संताप व्यक्त केला होता.

हेही वाचा- 

हे देखील वाचा