भरलग्नात नवरदेवाला चढला ‘पुष्पा फिव्हर’, केलं ‘असं’ काही की बघतच राहिले पाहुणेमंडळी

सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘द पुष्पा राईज’ चित्रपट प्रदर्शित होऊन बराच काळ लोटला आहे, पण ‘पुष्पा’ फिव्हर लोकांच्या डोक्यावरून उतरायचं नावंच घेत नाहीये. चित्रपटातील गाण्यांनीच नव्हे, तर चित्रपटातील डायलॉग्सनेही अवघ्या देशभरात धुमाकूळ घातला आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लग्नातील नवरदेव स्वत: ‘पुष्पा’चा मोठा चाहता असल्याचे दिसते. व्हिडिओमध्ये काय होते ते खरंच पाहण्यासारखे आहे.

नवरदेवावर चढला ‘पुष्पा फिव्हर’
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, नववधूने तिच्या भावी पतीच्या गळ्यात माळ घालताच नवरदेव वधूला पुष्पहार घालण्यापासून थांबवतो. यावेळी तो पुष्पाचा प्रसिद्ध डायलॉग ‘झुकेगा नहीं’ बोलताना दिसत आहे. त्यानंतर वरातमधील मंडळी नवरदेवाकडे पाहतच राहतात. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. (groom follow pushpa style in his own wedding guest and bride staring him watch most funny video)

View this post on Instagram

A post shared by F I L M Y G Y A N (@filmindustries2)

नेटकऱ्यांनी दिल्या मजेदार प्रतिक्रिया
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना त्यांच्या हसण्यावर नियंत्रण ठेवणे कठीण जात नाही. “एवढी स्टाईल दाखवली तर तुम्ही अविवाहीतच राहशील, अशी कमेंट एका यूजरने केली. अशाप्रकारे या व्हिडिओवर अनेक मजेदार कमेंट्स पाहायला मिळतील.

समंथाने पहिल्यांदा केला आयटम नंबर
याशिवाय ‘पुष्पा द राइज’ चित्रपटातील गाण्यांबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्री समंथा प्रभूने ‘ओ अंटा वा मावा’ गाण्यावर परफॉर्म केला आहे. या गाण्यातील अभिनेत्रीच्या बोल्ड अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. हे या चित्रपटाचे हिट गाणे आहे. या गाण्याच्या माध्यमातून समंथा पहिल्यांदाच आयटम नंबर करताना दिसली आहे. त्यासाठी तिने मोठी रक्कमही घेतली आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट सर्वत्र लोकप्रिय ठरत आहे. कमाइचे नवनवीन विक्रम या चित्रपटाने तयार केले आहेत. देशातील अनेक भागात सिनेमागृहे बंद असूनही या चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे. आत्तापर्यंत हा चित्रपट कन्नड, मल्याळम, तेलुगू, तमिळ आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये तुफान लोकप्रिय ठरला आहे. पुष्पाला दर्जेदार समजणाऱ्या प्रेक्षकांच्या नजरेला मात्र यामधल्या चूका लक्षात आल्याच नाहीत

हेही वाचा :

Latest Post