Thursday, November 14, 2024
Home बॉलीवूड संजय लिला भन्साळी करणार मल्टी स्टारर, पॅन इंडीया लेवलच्या चित्रपटाची घोषणा

संजय लिला भन्साळी करणार मल्टी स्टारर, पॅन इंडीया लेवलच्या चित्रपटाची घोषणा

बाॅलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लिला भन्साळी त्यांच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या चित्रटातुन ते नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. 1996 ला ‘खामोशी द म्युझिकल’मधून ते बाॅलिवूडमध्ये आले आणि ‘हम दिल दे चुके सनम’,’देवदास’ अशा चित्रपटांची निर्मिती करत त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या चित्रपटातून त्यांनी अशा काही कलाकृती बनवल्या की त्यामुळे प्रेक्षक त्यांच्या चित्रपटांचे दिवाने झाले. रामलिला, बाजिराव मस्तानी, पद्मावत आणि गंगुबाई या चित्रपटानंतर आता लवकरंच त्यांची ‘हीरामंडी’ ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संजय लिला भन्साळी(sanjay leela bhansali) त्यांच्या आगामी वेबसिरीज ‘हीरामंडी’ च्या कामात व्यस्त आहेत. अजूनही या वेबसिरीजच्या पोस्टप्रोडक्शनचे काम सुरु आहे. यादरम्यान ते त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. असं म्हणलं जातंय की, ते मल्टी स्टारर पॅन इंडीया फिल्म बनवणार आहेत. या चित्रपटाची घोषणा ते मार्चमध्ये करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा चित्रपट पॅन इंडीया लेवलचा असणार आहे.

आगामी वेबसिरीज हीरामंडी
संजय लिला भन्साळींची ‘हीरामंडी’ ही वेब सिरीज लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे, ही वेब सिरीज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफाॅर्मवर रिलीज होणार असून,तिचा टिजरदेखील रिलीज झाला आहे. यी वेबसिरीजमध्ये मनीशा कोइरल(Manisha Koirala), सोनाक्षी सिन्हा(Sonakshi Sinha), शर्मिन सेगल(Sharmin Segal) या अभिनेत्री मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. या सिरीजच्या टिजरमध्येच संजय लिला भंसाळींची वेगळी शैली दिसुन येत आहे. आतापर्यंत त्यांनी चित्रपटांच्या माध्यमातुन अनेक विषय मांडले आहेत, पण ते या सिरीजमधून कोणत्या विषयाला न्याय देणार? याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे. नेटफ्लिक्सच्या टिजरवरून ही वेब सिरीज वेश्या महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणार असल्याचे स्पष्ट होत आहे. परंतु तरीही सर्वचजण या सिरीजच्या रिलीजची वाट पाहत आहेत.

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा