Thursday, April 18, 2024

चित्रपटसृष्टीत येण्यासाठी संजीव कुमार यांनी लपवले खरे नाव; तर ‘या’ कारणामुळे नुतनने मारली होती त्यांच्या कालशिलात

आपल्या दमदार अभिनयाने सर्वाचेच लक्ष वेधून घेणारे अभिनेते म्हणजे संजीव कुमार होय. त्यांनी केवळ प्रेक्षकांच्या मनावर त्यांची छाप नाही पाडली, तर सर्वांच्याच मनात त्यांच्या प्रति प्रेम निर्माण केले. त्यांच्याबाबत असं म्हणतात की, ते शरीराने आणि चेहऱ्याने नाही तर डोळ्यांनी अभिनय करायचे. त्यांचे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य दोन्हीही खूप रंजक होते. आज संजीव कुमार यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म ९ जुलै १९३८ साली झाला होता. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी… (Sanjeev Kumar’s birth anniversary, let’s know about his life)

खूप कमी लोकांना ही गोष्ट माहीत असेल की, संजीव कुमार यांचे खरे नाव हरिहर जेठालाल जरिवला हे होते. अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी त्यांनी त्यांचे नाव बदलून संजीव कुमार ठेवले. सुरतमध्ये जन्मलेल्या संजीव कुमार यांचे कुटुंब तेव्हाच मुंबईला शिफ्ट झाले, जेव्हा ते सात वर्षांचे होते. त्यांनी जसे मुंबईमध्ये पाऊल ठेवले तसे ते आपोआपच अभिनय क्षेत्राकडे खेचले गेले. त्यांनी आधी थिएटरमध्ये काम केले आहे. त्यानंतर ते चित्रपट सृष्टीकडे वळाले.

संजीव कुमार यांनी १९६० साली ‘हम हिंदुस्थानी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सुरुवातीला छोटे-मोठे रोल केल्यानंतर १९६८ मध्ये आलेल्या ‘राजा और रंक’ या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटातील त्यांचे पात्र चांगलेच गाजले होते. त्यानंतर त्यांनी ‘आंधी’, ‘नमकिन’, ‘कोशिश और सुबह ओ श्याम’, ‘नया दिन नयी रात’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटात काम केले.

संजीव कुमार हे त्यांच्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आले होते . असं म्हणतात की, एकदा अभिनेत्री नूतनने संजीव कुमार यांच्या कानशिलात मारली होती. ज्यामुळे ते खूप चर्चेत आले होते. नूतन आणि संजीव कुमार हे ‘देवी’ या चित्रपटाची शूटिंग करत होते. खरंतर नूतन सेटवर जास्त कोणाशी बोलत नव्हत्या. पण ‘देवी’च्या सेटवर त्यांची आणि संजीव कुमार यांची चांगलीच ओळख झाली होती. त्यावेळी त्यांच्या रिलेशनशिपबाबत बातम्या रंगू लागल्या होत्या. एका पेपरमध्ये तर असे छापून आले होते की, नूतन त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश नाहीयेत आणि त्यांना संजीव कुमार यांच्याशी लग्न करायचे आहे.

तर काही माध्यमांच्या मते या सगळ्या अफवा होत्या आणि या अफवा इतर कोण नाही, तरी स्वतः संजीव कुमार पसरवत होते, असा त्यांनी दावा केला होता. जेव्हा नूतनला याबाबत समजले तेव्हा त्यांनी रागात संजीव कुमार यांच्या कानशिलात मारली होती. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले होते की, “मला त्यांना त्यांची जागा दाखवणे गरजेचे होते. जे काही बोलायचे होते, ते मी बोलले आणि ती गोष्ट संपवून टाकली. त्यानंतर मी म्हणाले की, चला आपला राहिलेला लव्ह सीन पूर्ण करूयात आणि आम्ही शूटिंग करायला गेलो.”

संजीव कुमार यांनी त्यांच्या करिअरमध्ये बॉलिवूडला एका पेक्षा एक जबरदस्त चित्रपट दिले आहेत. त्यांचा मृत्यू ६ नोव्हेंबर १९८५ साली मुंबई येथे झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘यार गजब आहेस तू’, श्रुती मराठेच्या ग्लॅमरस फोटोंवर चाहत्याची झक्कास कमेंट

-अभिनेत्री शगुफ्ता अलीच्या मदतीसाठी धावला जॉनी लिव्हर; आर्थिक खर्च भागवण्यासाठी विकल्यात घरातील वस्तू

-तापसी पन्नूच्या लग्नासाठी आई- वडील चिंतेत; म्हणाले, ‘आता कोणाशीही लग्न कर…’

हे देखील वाचा