Sunday, September 8, 2024
Home मराठी ‘गुलाबी साडी’ने आख्ख्या बॉलिवूडला नाचवलं; संजू राठोडने अंबानींच्या लग्नात केला लाईव्ह परफॉर्मन्स

‘गुलाबी साडी’ने आख्ख्या बॉलिवूडला नाचवलं; संजू राठोडने अंबानींच्या लग्नात केला लाईव्ह परफॉर्मन्स

सध्या सोशल मीडियावर फक्त अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा चालू आहे. यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला मार्चमध्ये सुरुवात झालेली होती. आणि आता जुलैमध्ये त्यांचा ग्रँड विवाह सोहळा पार पडलेला आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर या ठिकाणी त्यांचे लग्न झालेले आहे. 12 जुलै रोजी अनंत आणि राधिका यांनी लग्नगाठ बांधलेली आहे. त्यांच्या कार्यक्रमासाठी देश विदेशातील त्याचप्रमाणे बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते याचप्रमाणे अनेक गायकांनी देखील या सोहळ्यामध्ये त्यांचे कला दाखवलेली आहे. यामध्ये जस्टिन बीबर, अजय अतुल, शंकर महादेवन, हरिहरन, श्रेया घोषाल, सोनू निगम यांसारख्या कलाकारांनी अनंत आणि राधिकाच्या लग्नामध्ये गाणी गायलेली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by 5262 Studios (@5262.studios)

 

अशातच आता अंबानींच्या लग्न सोहळ्यातील आणखी एका मराठी गायकाचा व्हिडिओ समोर आलेला आहे. या मराठी गाण्याने सगळ्या बॉलिवूडला नाचायला भाग पडलेले आहे. मागील काही दिवसापासून गुलाबी साडी हे गाणे चांगले चर्चेत आलेले आहे. आणि हेच गाणे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात देखील ऐकायला मिळालेले आहे. गुलाबी साडी या गाण्याचा मूळ गायक संजू राठोड यांनी स्वतः या विवाह सोहळ्यात उपस्थित राहून हे गाणे सादर केलेले आहे. सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.

मराठी रॅपर आणि गायक संजू राठोडने स्टेजवर हे गाणे सादर केले आहे. तो स्टेजवर पोहोचताच पाहुण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कल्ला झालेला दिसत आहे. त्याने गुलाबी साडी या गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स दिला. यावेळी लग्नाच्या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे पाहुणे मंडळी त्याचप्रमाणे संपूर्ण बॉलीवूड या गाण्याच्या हुक स्टेपवर डान्स करताना दिसले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

तृप्ती डिमरीला करायची आहे प्रत्येक प्रकारची भूमिका; म्हणाली, ‘स्वतःला आव्हान देत राहणं…’
दोन अनोळखी लोकांनी केला अनंत-राधिकाच्या लग्नातब प्रवेश; दोघांवरही गुन्हा दाखल

हे देखील वाचा