Tuesday, July 9, 2024

सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणाऱ्या संस्कृती बालगुडेच्या ‘बोल्ड एँड ब्युटीफुल’ लूकने नेटकरी घायाळ

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्री येतात आणि लोकांना त्यांच्याबद्दल माहिती होण्याआधीच त्या चित्रपटातून दूर गेलेल्या असतात. पण येईल त्या प्रसंगाला तोंड देऊन प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करणे हे अगदी निवडक अभिनेत्रींना जमते. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे. संस्कृतीने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. अवघडातली अवघड भूमिका संस्कृती अगदी सहजतेने पार पाडते. अतिशय निवडक चित्रपट आणि त्यातला उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीमध्ये एक खास स्थान मिळवले आहे. तिच्या याच अंदाजामुळे तिचे लाखो चाहते आहेत. या चाहत्यांसाठी ती दरदिवशी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. चाहत्यांकडूनही तिच्या पोस्टला खूप प्रेम मिळते. संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. नुकतेच तिने एक फोटोशूट केले आहे.

संस्कृतीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तसेच कानात मोठे इअरिंग घातले आहेत. मिडल पार्टेशन करून तिने केस मागे बांधले आहेत. या लूकमध्ये ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिने वेगवेगळ्या पोझ देत हे फोटोशूट केले आहे. (Sanskruti balgude’s glamrous photos viral on social media)

संस्कृतीचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा लूक खूपच आवडला आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिचा हा लूक ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा’ या शोमधील आहे. ती सध्या या शोचे सूत्रसंचालन करत आहे.

संस्कृती ही मराठी चित्रपटसृष्टीमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात ‘पिंजरा’ या मराठी मालिकेपासून केली आहे. त्यानंतर तिला अनेक चित्रपटात काम मिळाले आहे. तिने ‘रे राया’, ‘लग्न मुबारक’, ‘शॉर्टकट दिसतो पण नसतो’, ‘शिव्या’, ‘निवडुंग’, ‘भय’, ‘सांगतो ऐका’ या चित्रपटात काम केले आहे. या आधी ती शेवटची ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटात दिसली होती.

ती लवकरच ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात संस्कृतीसोबत अभिनेता शुभंकर तावडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ.निखिल राजेशिर्के असे कलाकार काम दिसणार आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

हे देखील वाचा