Saturday, June 29, 2024

Santosh Chordia Death | मराठी सिनेसृष्टीने गमावला आणखी एक हूरहुन्नरी कलाकार, संतोष चोरडिया यांचे वयाच्या 57 व्या वर्षी निधन

Santosh Chordia Death |मराठी सिनेसृष्टीला आणखी एक धक्का  बसलेला आहे. ते म्हणजे एकपात्री कलाकार संतोष चोरडिया यांचे पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेले आहे. वयाच्या अवघ्या 57 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे. आज दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्यामागे त्यांच्या कुटुंबात त्यांचा भाऊ मुलगा अजिंक्य, कन्या अपूर्वा असा परिवार आहे त्यांच्या झालेल्या या निधनाने त्यांच्या कुटुंबात तसेच सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांनी मागील अनेक वर्षापासून नाटक, मालिका, चित्रपट अशा क्षेत्रात काम केलेले आहे. गेल्या 38 वर्षे ते सिनेसृष्टीत कार्यरत आहे. त्यांनी दुसरी गोष्ट, दगडाबाईची चाळ, प्रेमा सरगम अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये तसेच मालिकांमध्ये काम केलेले आहे.

त्याचप्रमाणे त्यांनी जिना इसी का नाम है, फुल टू धमाल या चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच सादरीकरण देखील केलेले आहे. त्यांच्या हसवा हसवी या एकपात्री प्रयोगाने सगळ्यांना खूप हसवले होते. नेहमीच प्रेक्षकांच्या गरजांचा विचार करून त्यांनी अभिनय केला आहे. आणि प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवले आहे. असा हुरहुन्नरी कलाकार गमावल्याने सिनेसृष्टीत सध्या मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकार तसेच त्यांचे चाहते देखील सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘ऍनिमल’नंतर रणबीर कपूर साकारणार रामाची भूमिका, ‘या’ दिवशी होणार शूटिंगला सुरुवात
खोतांच्या घराला लागलेले पंचक सुटणार ? उत्सुकता वाढवणारा ‘पंचक’चा ट्रेलर प्रदर्शित

हे देखील वाचा