सपना चौधरींचे नवीन ‘लोरी’ गाणे प्रदर्शित, आई-मुलाच्या अतूट नात्यावर आधारित हे गाण तुफान हिट


हरयाणवी डान्सर आणि गायिका सपना चौधरी ही उत्तर भारत आणि हरियाणामध्ये प्रचंड लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे. ती नेहमीच तिच्या नवनवीन गाण्यांच्या अल्बममुळे चर्चेत असते. ती तिचे गाणे नेहमी यूट्यूब आणि सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचे नुकतेच ‘चंद्रावल’ गे गाणे तुफान हिट झाले आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने सपनाने तिच्या फॅन्सला हे गाणे भेट म्हणून दिले आहे. तिच्या फॅन्सने देखील या भेटीचे भरभरून कौतुक केले आहे. खूपच कमी दिवसांमध्ये लाखो हिट्स या गाण्याने मिळवले.

आता पुन्हा एकदा सपना नवीन गाणे घेउन आली आहे. हे गाणे मात्र तिच्या इतर गाण्यांपेक्षा खूप वेगळे आहे.

सपनाच्या नवीन गाण्याचे नाव आहे ‘लोरी’. एका आई आणि मुलाच्या अतूट प्रेमावर आणि त्यांच्या नात्यावर हे गाणे आधारित आहे. ह्या गाण्याच्या शब्दांसोबतच गाण्याचे चित्रीकरणही खूपच सुंदर आणि वास्तविक आहे. एका आई तिचे काम करता करता देखील तिच्या बाळाचा सांभाळ योग्य पद्धतीने सांभाळ करते. अशा सुंदर पद्धतीचे हे गाणे आहे.

सपनाने नुकतेच तिचे यूट्यूब चॅनेल ड्रीम्स एंटरटेनमेंट हरयाणवी लाँच केले आहे. याच चॅनेलवर तिचे ‘लोरी’ गाणे प्रदर्शित झाले आहे. सपनाने सांगितले की तिने हे गाणे हरयाणवी संस्कृतीला पुढे नेण्यासाठी लाँच केले आहे.
सपनाचे ‘चंद्रावल’ हे गाणे अजूनही ट्रेण्डिंगमध्ये टॉपवर असून गाण्याला लाखो व्हिव्ज देखील मिळत आहे. आता सपनाचे आलेले ‘लोरी’ हे गाणे देखील असेच जबरदस्त हिट होणार यात शंका नाही.


Leave A Reply

Your email address will not be published.