हरियाणवी डान्सिंग क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सपना चौधरीला आज कोणत्याही वेगळ्या खास ओळखीची गरज नाही. तिने तिच्या मेहनतीच्या आणि डान्सच्या जोरावर हरियाणवी इंडस्ट्रीमध्ये मोठा नावलौकिक मिळवला आणि हळूहळू ती संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाली. सपनाने तिच्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे, त्यानंतर ती इथे पोहचली आहे. ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूपच कमी बोलते. मात्र तिने जेव्हा जेव्हा याबद्दल भाष्य केले तेव्हा तिने सर्वांनाच प्रेरणा दिली. नुकतेच तिने तिच्या आयुष्याबद्दल एका स्टेजवर भाष्य केले. यावेळी तिने तिच्या संघर्षाच्या दिवसांना उजाळा देत तिला ट्रोल करणाऱ्या लोकांना सणसणीत उत्तरं दिली.
View this post on Instagram
या स्टेजवर सपनाने काही गोष्टी अशा सांगितल्या ज्या ऐकून सर्वानांच नक्की प्रेरणा मिळेल. सोबतच तिने सगळ्यांना कधीही हार पत्करू नका असे देखील सांगितले. सोशल मीडियावर एक ग्रुप असा आहे, जो नेहमीच तिला काही ना काही कारण काढून ट्रोल करत असतो. या व्हिडिओवर देखील अनेकांनी तिला ट्रोल केले, मात्र तिने या सर्व ट्रोलर्सला चांगलेच उत्तरं दिले. सपनाने तिच्या या व्हिडिओमध्ये म्हटले आहे, “प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक वेळ येते जेव्हा तो पडतो, उठतो, समजून घेतो, पुन्हा पडतो आणि उठतो.” माझ्या आयुष्यात देखील असे काहीसे झाले आहे.”
तिच्या या व्हिडिओवर एकाने कमेंट करत लिहिले, “ही नाचणारी या ज्ञान देत आहे, मोटिवेश्नल स्पीकर देखील फेल होते.” या व्हिडिओला सपनाने दुर्लक्षित अजिबात केले नाही. उलट कमेंट करणाऱ्याला तिने सडेतोड उत्तर दिले. ती म्हणाली, “हो नक्कीच तू खरं बोललास आणि त्याहीपेक्षा कमालची गोष्ट आहे, तू रिकामटेकडा माणूस आहे. तुझ्याकडे कोणतेही काम नाही. कोणतेतरी काम शोध आणि तिथे डोकं लाव, तुझ्या कामाला येईल.” सपनाचा हा अंदाज सर्वाना तुफान आवडला असून, तिच्या या स्पष्टव्यक्ता स्वभावाचे जास्त कौतुक होत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पडद्यावरची पार्टनर ते आयुष्यभराची अर्धांगिनी, ‘अशी’ होती रमेश देव आणि सीमा देव यांची लव्हस्टोरी
सुकेशच्या आधी चाहत खन्नाचे नाव जाेडले गेले ‘या’ प्रसिद्ध गायकासोबत; 2 घटस्फाेटानंतर कुठे आहे अभिनेत्री?