Wednesday, July 3, 2024

‘अजिबात सोप्पं नाही…’ व्हिडिओ शेअर करत सपना चौधरीने दिला ‘हा’ इशारा

हरियाणवी डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) हिला अख्ख्या भारतात कोण ओळखत नसेल असं होणार नाही. अभिनय,नृत्य यात तर तिनं आपला जलवा दाखवलेला आपण सगळ्यांनी चांगलाच पाहिला,अनुभवला असेल. सपना चौधरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सपनाने नुकताच इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे.

सपनाने ज्यामध्ये तिचा उच्च फॅशन लुक आणि मोहिनी वाला एटिट्यूडने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सपना चौधरी न्यूड मेकअपसह किलर डायलॉग बोलताना दिसत आहे. दीपिका पदुकोणचा ‘हॅप्पी न्यू इयर’ हा चित्रपट पाहिला असेल, तर हा डायलॉग तुम्हाला चांगलाच परिचयाचा असेल. कारण मोहिनीसाठी नृत्य करणे सोपे नाही. ही गोष्ट केवळ मोहिनीवरच नाही तर सपना चौधरीवरही अगदी फिट बसते. कारण सपना चौधरीच्या डान्सची पातळी जुळवणे हे सोपे काम नाही.

 

View this post on Instagram

 

सपना चौधरीच्या पोशाखाबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीने पांढऱ्या कुर्त्यासोबत अप्रतिम हेअरस्टाईल केली आहे. सपना चौधरीचा हा व्हिडिओ पाहून इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. व्हिडिओमध्ये सपना चौधरीचे एक्सप्रेशन अप्रतिम दिसत आहेत. मोहिनी बनलेल्या सपना चौधरीची स्टाईल चाहत्यांची डोकी उंचावत आहे.

सपना चौधरीच्या व्हिडीओवर चाहते सतत लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना सपना चौधरीने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘हे अजिबात सोपे नाही… सपना चौधरीचे चाहते तिच्या व्हिडिओवर सतत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काही जण तिला डान्सिंग क्वीन बनवायला सांगत आहेत, तर काही तिच्या मुद्द्याशी सहमत आहेत आणि लिहित आहेत की, तू बरोबर आहेस…

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
अभिनेत्री स्मिता पाटील यांचा लेक पुन्हा प्रेमात, पत्नीसोबत वेगळे झाल्यानंतर ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट
स्वरा भास्करने सांगितलं तिच्या आयुष्यातील ‘तो’ किस्सा, शत्रूचाही केला खुलासा
उर्मिला मातोंडकरने चंकी पांडेसोबत लावले ठुमके, व्हिडिओ तुफान व्हायरल

हे देखील वाचा