Saturday, July 6, 2024

‘बाळाचे प्लॅनिंग करेल तेव्हा सर्वात आधी मीडियाला सांगेल’; प्रेग्नेंसीबाबत अफवांवर ‘देसी क्वीन’ सपना चौधरीने दिली प्रतिक्रिया

हरियाणवी डान्सर आणि देसी क्वीन या नावाने प्रसिद्ध असलेली म्हणजे सपना चौधरी होय. सपना चौधरी ही संपर्ण देशात एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सर्वत्र तिचे चाहते पसरलेले आहेत. तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात ती नक्की काय करते याबाबत जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच खूप उत्सुक असतात. आत्ताच काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, सपना दुसऱ्यांदा आई होणार आहे. यावर सपनाने आता प्रतिक्रिया दिली आहे.

सपना चौधरीने ‘आज तक’ला दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत माहिती सांगितली आहे. तिने सांगितले की, “माझ्या प्रेग्नेंसीबाबत ज्या बातम्या माध्यमात पसरत आहेत, त्यात काहीच खरेपणा नाहीये. मी प्रेग्नेंट नाहीये. मी सध्या माझ्या कामावर लक्ष देत आहे आणि येत्या पाच वर्षात तरी मी अजून दुसऱ्या बाळाबाबत कोणतेच प्लॅनिंग केलेले नाही.” या नंतर तिने हसत सांगितले की, “हो!! यानंतर जेव्हा केव्हा बाळाचे प्लॅनिंग करेल, तेव्हा ही गोष्ट मी सर्वात आधी माध्यमांना सांगेल. यावेळी मी एक नाही जुळ्या मुलांचे प्लॅनिंग करणार आहे.”

सपना चौधरीने मागच्या वर्षी ४ ऑक्टोबरला एका मुलाला जन्म दिला आहे. परंतु तिने अजूनही तिच्या चाहत्यांना तिच्या मुलाचे नाव सांगितले नाही. सपनाने मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात तिचा बॉयफ्रेंड वीर साहू याच्याशी लपून लग्न केले. या घटनेतून तिचे चाहते बाहेर निघत नाही, तर लगेच तिच्या प्रेग्नेंसीबाबत माहिती समोर आली होती.

सपना अनेक स्टेज शो करत असते. तिची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक खूप आतुर असतात. सपना चौधरीने अनेक हिट गाणी दिली आहेत. ज्यांना कोटीने व्ह्यूज मिळाले आहेत. तिची ‘गजबन पानी’, ‘सुलफा’, ‘छोरी बिंदास’, ‘इंग्लिश मिडीयम पढी’ यांसारखी अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत. या गाण्यांच्या लोकप्रियतेमुळे तिला चित्रपटात काम करण्याच्या देखील ऑफर येत असतात. तिने बॉलिवूडमध्ये ‘दोस्ती के साईड एफेक्ट्स’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त चालला नाही, पण सपनाच्या अभिनयाचे सर्वत्र खूप कौतुक झाले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंटरनेटवर धमाल करतेय ‘ही’ दयाबेन; व्हिडिओ पाहून चक्रावले सोशल मीडिया युजर्स

-ऐश्वर्याशी झालेल्या ब्रेकअपनंतर विवेकने एका मंत्र्याच्या मुलीसोबत थाटला संसार; आज जगतोय सुखी आयुष्य

-चिमुकल्या ‘आनंदी’ची निरागसता पाहून प्रेक्षकांचे हरपले भान; ‘बालिका वधू २’चा प्रोमो झाला रिलीझ

हे देखील वाचा