Friday, June 13, 2025
Home अन्य एकदम झक्कास! सपना चौधरीने केले ग्लॅमरस फोटो शेअर; म्हणाली, ‘…माझ्यातील जनावर झोपले आहे, मेले नाही’

एकदम झक्कास! सपना चौधरीने केले ग्लॅमरस फोटो शेअर; म्हणाली, ‘…माझ्यातील जनावर झोपले आहे, मेले नाही’

हरियाणवी ‘डान्सिंग क्वीन’ नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सपना चौधरी. ती तिच्या सौंदर्यामुळे आणि डान्समुळे सर्वत्र प्रसिद्ध आहेत. त्यात तिच्या फॅशन सेन्सची तर सर्वत्र चर्चा चालू असते. सोशल मीडियावर देखील ती तिच्या वेगवेगळ्या अंदाजाचे दर्शन तिच्या चाहत्यांना देत असते. नुकतेच सपनाने एक फोटोशूट केले आहे. यात तिने वेस्टर्न लूक केला आहे. तिचे हे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. (Sapna choudhary’s bold photo viral on social media)

सपनाने काळ्या रंगाचा वेस्टर्न ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच स्टायलिश दिसत आहे. तिने काळ्या रंगाचा फ्लोर लेंथ गाऊन घातला आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये ती एका गाडीसमोर उभी राहून पोज देताना दिसत आहे. ती एका गार्डनमध्ये उभी राहिलेली दिसत आहे.

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “मला ढकलू नका. माझ्यातील जनावर झोपलेले आहे, मेले नाही.” तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. युजर या फोटोवर कमेंट करून तिच्या या वेस्टर्न लूकचे कौतुक करताना दिसत आहे. तिच्या या फोटोंना ८० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

मागील काही दिवसात सपनाच्या प्रेग्नेंसीबाबत बातम्या समोर आल्या होता. तिने ‘आज तक’ला दिलेल्या एका मुलाखतीत या बाबत माहिती सांगितली आहे. तिने सांगितले की, “माझ्या प्रेग्नेंसी बाबत ज्या बातम्या माध्यमात पसरत आहेत, त्यात काहीच खरेपणा नाहीये. मी प्रेग्नेंट नाहीये. मी सध्या माझ्या कामावर लक्ष देत आहे आणि येत्या पाच वर्षात तरी मी अजून दुसऱ्या बाळाबाबत कोणतेच प्लॅनिंग केलेले नाही.”

यानंतर तिने हसत सांगितले की, “हो!! यानंतर जेव्हा केव्हा बाळाचे प्लॅनिंग करेल, तेव्हा ही गोष्ट मी सर्वात आधी माध्यमांना सांगेल. यावेळी मी एक नाही जुळ्या मुलांचे प्लॅनिंग करणार आहे.”

याआधी देखील सपनाने असे अनेक ग्लॅमरस फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोशल मीडियावर देखील ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्यामुळे चाहत्यांना खुश करण्याची एकही संधी ती सोडत नाही

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिमानास्पद! ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२१’ने उर्वशी रौतेलाचा गौरव; फोटो अन् व्हिडिओ केला शेअर

-‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’

-अरे व्वा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने रचलाय नवीन विक्रम; आठव्यांदा साकारणार ‘महादेवा’ची भूमिका

हे देखील वाचा