अखेर प्रतीक्षा संपली! अक्षय कुमार, धनुष व सारा अली खानचा ‘अतरंगी रे’ सिनेमा ‘या’ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला


कोरोनामुळे अनेक चित्रपटांचे शूटिंग रखडले होते तर काही चित्रपटाचे प्रदर्शन देखील थांबविण्यात आले होते. अशातच काही चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. असे अनेक चित्रपट आहेत, जे सध्या खूपच चर्चेत आहेत आणि ते रिलीज होण्याची प्रेक्षक वाट पाहात आहेत. अशाच एका चित्रपटाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे ‘अतरंगी रे’. चक्क ताजनगरीमध्ये या चित्रपटाच्या काही भागाचे चित्रीकरण देखील करण्यात आले आहे.

अतरंगी रे या चित्रपटाची घोषणा मागील वर्षाच्या सुरुवातीलाच झाली होती. तसेच मार्च महिन्यात वाराणसीत शूटिंगला देखील सुरुवात होणार होती पण कोरोनाव्हायरस आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटाचं शूटिंग थांबवलं होते. अक्षय कुमारसाठी सध्या दिवस खूप चांगले आहेत. त्यात एकापाठोपाठ एक त्याच्या ‘बेल बॉटम’ आणि ‘अतरंगी रे’ या चित्रपटांच्या तारखा समोर आल्या आहेत. दोन्ही चित्रपट याचवर्षी प्रदर्शित होणार आहेत. सारा अली खानने आपल्या इन्स्टाग्रामवर या चित्रपटाबद्दल माहिती आपल्या चाहत्यांना शेयर केली आहे.

‘अतरंगी रे’ हा चित्रपट ६ ऑगस्ट २०२१ ला चित्रपट गृहात प्रदर्शित होणार असून, पहिल्यांदाच प्रेक्षकांना अक्षय कुमार, सारा आणि धनुष्य यांच्यात लव्हट्रँगल पाहायला मिळणार आहे. आनंद एल रॉय यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार आणि भूषण कुमार करणार आहेत. या चित्रपटात तिन्ही कलाकारांचे वेगवेगळे रुप चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. तसेच साराने या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारलेली असून अक्षय आणि धनुषच्या व्यक्तिरेखांमध्येही त्यांची स्वतःची एक वेगळी खासियत दिसणार आहे.

कोरोनामुळे अनेक चित्रपटगृह कित्येक महिने बंद राहिले होते. त्यामुळे आता काही दिवसांपूर्वी माहिती प्रसारण मंत्रालयाने काही मार्गदर्शक तत्वानुसार शंभर टक्के सिनेमागृह उघडण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सिनेमेगृह आता चालू झाली आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

-लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!


Leave A Reply

Your email address will not be published.