Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

सारा खानच्या अतरंगी व्हिडिओने वेधले सोशल मीडियाचे लक्ष, चाहत्यांनी देखील दिल्या अतरंगी प्रतिक्रिया

हिंदी चित्रपट जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या अभिनया इतक्याच सोशल मीडियावरही चर्चेत असतात. कधी फोटो तर कधी गमतीशीर व्हिडिओ शेअर करत त्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरत असतात. यामध्ये सर्वात जास्त नाव घेतले जाते ते म्हणजे अभिनेत्री सारा अली खानचे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या सारा अली खानचा (Sara ali Khan)  एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे ज्यामध्ये साराचा खेळकर स्वभाव पाहायला मिळत आहे. काय आहे नक्की हा व्हिडिओ चला जाणून घेऊ. 

अभिनेत्री सारा अली खान तिच्या मिश्किल आणि खेळकर स्वभावासाठी  चांगलीच प्रसिद्ध आहे. चित्रपटाप्रमाणेच ती सोशल मिडियावरही नेहमीच चर्चेत असते. यावरुन ती आपले नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अनेकदा तिचे मजेशीर आणि खेळकर व्हिडिओही व्हायरल होत असतात ज्यावर तिचे चाहते भरभरुन प्रतिक्रिया देताना दिसतात. सध्या तिचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे. ज्यावर तिच्या चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. सारा अली खान सध्या गुजरातमध्ये आहे जिथे ती तिच्या गॅसलाइट चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, ज्यामध्ये ती विक्रांत मॅसीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सारा अली खानला शूटिंगमधून वेळ मिळताच ती तिच्याच दुनियेत हरवून जाते.

सारा अली खानने एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती मिठाच्या डोंगरासमोर दिसत आहे. आणि खूप सुंदर गाण्यावर डान्स करत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये तिचा धमाकेदार डान्स पाहायला मिळत आहे. साराने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत  इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे ज्यावर चाहत्यांच्याही भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान अभिनेत्री साराने अतरंगी रे, लव आज कल अशा अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा