Saturday, April 20, 2024

नमस्कार प्रेक्षकांनो! भारताचे सौंदर्य दाखवताना रिपोर्टर बनली सारा अली खान, व्हिडिओ झाला व्हायरल

हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टची सगळ्यात जास्त चर्चा होत असते. या अभिनेत्री त्यांच्या अभिनया इतक्याच त्यांच्या इतर गोष्टींची चर्चा होत असते. आता अभिनेत्री सारा अली खानचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सारा अली खान (Sara ali Khan)  ही त्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी खूप कमी काळात इंडस्ट्रीमध्ये स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. इंडस्ट्रीत येऊन साराला फक्त काही वर्षे झाली आहेत पण इतक्या कमी कालावधीत तिने आपली खास ओळख निर्माण केली आहे. याचे कारण केवळ तिचा अभिनयच नाही तर तिची खास शैली देखील आहे ज्यासाठी ती विशेषतः ओळखली जाते. जेव्हा ती कॅमेऱ्यासमोर प्रेक्षकांना नमस्कार करते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक चमक येते. जी तिच्या चाहत्यांना आवडत असते. आता बऱ्याच दिवसांनी सारा पुन्हा एकदा रिपोर्टरच्या स्टाईलमध्ये परतली आहे.

sara ali khan
Photo Courtesy: Instagram/saraalikhan95

सारा अली खानने इन्स्टाग्रामवर तिचा नवीन व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याची सुरुवात प्रेक्षकांना नमस्ते करते. या व्हिडिओमध्ये सारा देशाच्या कानाकोपऱ्यातील सौंदर्य दाखवत आहे. कधी पर्वत तर कधी समुद्र दाखवत ती प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. साराने चाहत्यांसाठी हा व्हिडिओ एडिट केला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. सारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते त्यावरुन ती व्हिडिओ आणि फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांशी संपर्क करत असते.

Sara-Ali-Khan
Photo Courtesy: Instagram/saraalikhan95

सारा अली खान तिच्या करिअरमध्ये हळूहळू का होईना पण प्रगती करत आहे. तिच्या दमदार अभिनयाचे आणि सौंदर्याचे नेहमीच कौतुक केले जाते. ‘केदारनाथ’ सारख्या उत्कृष्ट चित्रपटाद्वारे पदार्पण केलेल्या साराने ‘कुली नंबर 1′, सिंबा सारख्या व्यावसायिक चित्रपटांद्वारे सगळ्यांचीच मने जिंकली आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटात तिने कौशल्य ज्या प्रकारे दाखवले ते कौतुकास्पद होते.’अतरंगी रे’ साठी सारा अली खानच्या अभिनयाची सगळीकडे चर्चा झाली. आता ती ‘लुका छुपी 2’ मध्ये विकी कौशलसोबत दिसणार आहे, या चित्रपटाचे तिने गेल्या महिन्यात शूटिंग पूर्ण केले आहे.

हेही वाचा  –

जेव्हा रागाच्या भरात सलमान खानने निर्माता साजिद नाडियादवाला यांच्या अंगावर भिरकावली डायरी तेव्हा…

जेव्हा भोजपुरी क्वीन आम्रपाली दुबे बनली बंगाली बाला, तेव्हा तिला पाहून फॅन्स म्हणाले…

प्रेग्नन्सीच्या काळातही काजल अग्रवालने केला जिममध्ये व्यायाम, सोबतच दिल्या ‘या’ दिवसांमध्ये फिट राहण्याच्या टिप्स

हे देखील वाचा