Monday, July 1, 2024

साराला अली खान देखील झाली रिप्लेस, ड्रग्स प्रकरणात नाव आल्याने सारा ऐवजी ‘या’ अभिनेत्रीला सिनेमात मिळाली एन्ट्री

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या चौकशी दरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा होत आहे. यातीलच एक गोष्ट म्हणजे, बॉलिवूडचे ड्रग्स कनेक्शन. जेव्हा या ड्रग्स कनेक्शनमध्ये माहिती समोर यायला लागली तेव्हा अनेक मोठमोठ्या कलाकारांची नावे यात होती. त्यातीलच एक नाव म्हणजे सारा अली खान.

साराचे नाव या रॅकेट मध्ये आल्यापासून तिच्या खाजगी आयुष्यासोबत व्यावसायिक आयुष्यावरही त्याचा परिणाम झाला आहे. प्राप्त माहितीनुसार साराच्या या ड्रग्स प्रकरणामुळे तिच्या हातातून ‘हिरोपंती २’ हा सिनेमा निसटला आहे.

बॉलिवूड हंगामाच्या बातमीनुसार जेव्हा ड्रग्सप्रकरणी सारा अली खानचे नाव आले आणि तिला नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने चौकशीसाठी बोलावले तेव्हा चित्रपटाच्या निर्मात्यांनी तिला यातून हटवण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी सारा टायगर श्रॉफ सोबत ‘हिरोपंती २’ मध्ये दिसणार होती. मात्र आता तिला या सिनेमातून डच्चू देण्यात आला आहे. साराने खूप कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी असूनही आपल्या अभिनयाच्या जोरावर ती हे स्थान निर्माण करू शकली. मात्र ड्रग्स प्रकरणात तिचे नाव आल्याने तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत ट्रोल केले गेले. या प्रकरणामुळे तिची छबी देखील खराब झाली. शिवाय नेपोटीझम मुळे देखील अनेक स्टार किडला ट्रोल केले गेले. याचा सरळ सरळ परिणाम चित्रपटावर होऊ नये, कदाचित याचमुळे निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नसल्याने त्यांनी साराला सिनेमातून काढण्याचा निर्णय घेतला असेल.

साराची जागा ‘स्टूडेंट ऑफ द इयर २’ मधून पदार्पण केलेल्या तारा सुतारियाने घेतली आहे. तारा आणि टायगरने ‘स्टूडेंट ऑफ द इयर २’ मध्ये सोबतच काम केले आहे. साजिद नाडियाडवाला यांच्या प्रोडक्शन हाउस नाडियाडवाला ग्रैंड संस मध्ये हा चित्रपट बनत आहे. लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला दुबईमध्ये सुरुवात होणार आहे. सध्यातरी चित्रपटाच्या प्रदर्शनची तारीख १६ जुलै २०२१ सांगण्यात येत आहे.

हे देखील वाचा