बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा सोशल मीडियासोबत खूप जवळचा संबंध आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असते. अशातच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या कारमधून उतरून पळताना दिसत आहे. या वेळी तिचा फोटो काढणाऱ्या पॅपराजींवर देखील ती भडकली होती. हा व्हिडिओ मुंबईमधील एक रेकॉर्डिंग स्टुडिओचा आहे. जिथे सारा अली खान स्पॉट झाली आहे.
साराचा मोबाईल हरवला होता आणि पॅपराजी तिचे फोटो काढत होते. यावेळी ती त्यांच्यावर रागवताना दिसली. कारण त्यावेळी तिला तिच्या मोबाईलची जास्त काळजी होती. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Sara Ali Khan gets upset with paps as they click while she lost her phone)
या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, सारा गाडीतून उतरून पळत असते. यावेळी ती म्हणते की, “माझा फोन हरवला आहे आणि तुम्हाला फोटोच पडलं आहे.” हे म्हणत ती स्टुडिओकडे पळत जाते.
यानंतर ती परत येते तेव्हा पॅपराजी तिचे फोटो काढतात. तेव्हा सारा म्हणते की, “इथे माझा मोबाईल हरवला आणि आणि तुम्ही फोटो काय काढताय?” यानंतर ती गाडीत बसले. यावर पॅपराजी तिला विचारतात की, तिचा मोबाईल सापडला का? यावर ती हो असे उत्तर देते आणि निघून जाते.
सारा अली खानचा आगामी चित्रपट ‘अतरंगी रे’ हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सारा अली खान, धनुष आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात ती एका बिहारी मुलीचे रिंकूचे पात्र निभावताना दिसणार आहे. जी तिचा पती आणि प्रियकर दोघांवर प्रेम करते. तिचे लग्न एका तमिळ मुलासोबत म्हणजेच धनुषसोबत जबरदस्तीने लावून दिले जाते. परंतु ती अक्षय कुमारवर देखील प्रेम करत असते. त्यांचा हा चित्रपट बघण्यास नक्कीच मजा येणार आहे. हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मिलिंद गुणाजी यांच्या मुलाचा साखरपुडा थाटात पडला पार, सूनबाई आहेत ‘या’ क्षेत्राशी निगडित
-ऐकलंत का! गायिका योगिता बोराटेंचा ‘प्रेमरंग’ कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला