बॉलिवूड जगतातील अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या प्रेमप्रकरणांची नेहमीच चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. अशीच चर्चा काही वर्षांपूर्वी चॉकलेटबॉय कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आणि सारा अली खानच्या(Sara Ali Khan) संबंधाची सुरू होती. २०१८ मध्ये सारा अली खान आणि कार्तिक आर्यनची जोडी चांगलीच चर्चेत आली होती. दोघेही अनेकदा एकत्र फिरताना दिसून येत होते, त्यामुळेच दोघांमध्ये प्रेम बहरत असल्याच्या बातम्या रंगू लागल्या होत्या. आता पुन्हा एकदा या चर्चा रंगू लागल्या आहेत. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.
अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान दोघेही बॉलिवूडमधील उगवते सितारे म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयाने दोघांनीही अल्पावधीतच आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यांच्या चित्रपटांइतकेच दोघेही त्यांच्या नात्यामुळेही चांगलेच चर्चेत आले होते. अभिनेत्री सारा अली खानने नॅशनल टिव्हीवर कार्तिक आर्यन माझा क्रश असल्याची कबुली दिली होती. यामुळेच 2018 मध्ये एका कार्यक्रमादरम्यान, रणवीर सिंगने सारा अली खान आणि कार्तिक आर्यनची एकमेकांशी ओळख करून दिली. साराच्या आनंदासाठी रणवीर सिंगने हे पाऊल उचलले होते. त्यामुळेच रणवीरने संधीचा फायदा घेत कार्तिकला साराला भेटायला लावले. 4 वर्षांनंतर आता वरुण धवनने तेच केले आहे.
कार्तिक आर्यन, वरुण धवन, क्रिती सेनन आणि सारा अली खान यांची मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान भेट झाली. या चौघांना एकत्र पाहून सर्व कॅमेरे त्यांच्याकडे वळले. या कार्यक्रमाचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये वरुण धवन साराचा हात धरून तिला कार्तिककडे घेऊन जात असल्याचे दिसत आहे.
व्हिडिओमध्ये वरुणने साराचा हात पकडून तिला कार्तिकजवळ आणले. साराला कार्तिककडे घेऊन गेल्यावर वरुण लगेच तिला सोडून क्रितीकडे जातो आणि तिला मिठी मारायला लागतो. सारा आणि कार्तिकसाठी हा क्षण थोडा विचित्र ठरतो. पण दोघेही सांभाळून घेतात. यानंतर कार्तिक आणि सारा पापाराझींसमोर पोज देऊ लागले. कार्तिक आणि साराचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक वरुण धवनला सारा-कार्तिकचा खरा मित्र म्हणू लागले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
- हेही वाचा –
- भुलभूलैय्या २: अनाथाश्रमातील मुलांसाठी कार्तिक आर्यनने ठेवले खास स्क्रिनिंग, चित्रपटाच्या यशाचे केले जोरदार सेलिब्रेशन
- ‘टकाटक २’च्या प्रदर्शनाची तारीख घोषित, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुप्रतिक्षित चित्रपट
- ‘के प्रोजेक्ट’च्या सेटवर दीपिका करतेय नखरे,अडचणीत आला दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास