Tuesday, July 23, 2024

‘के प्रोजेक्ट’च्या सेटवर दीपिका करतेय नखरे,अडचणीत आला दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला (Deepika Padukone) काही दिवसांपूर्वी अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या बातमीने दीपिकाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. रुग्णालयात दाखल करुन उपचार घेतल्यानंतर आता दीपिका आराम करत आहे. सुपरस्टार प्रभास सोबतच्या के प्रोजेक्ट या चित्रपटाच्या शूटिंगवेळीच तिची प्रकृती खराब झाली होती. आता दीपिकाच्या या कुरबुरीमुळे अभिनेता प्रभास नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.

दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि मनमोहक सौंदर्याने तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या दीपिका पदुकोण तिच्या आगामी ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटात प्रभाससोबत दिसणार आहे. या चित्रपटाच्या सेटवर दीपिकाची तब्येतही बिघडली होती. पण आता बातमी समोर आली आहे की दीपिका पदुकोणच्या कुरबुरीमुळे प्रभास नाराज झाला आहे. दोघांमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याच्या बातम्याही येत आहेत.

प्रभास हा दाक्षिणात्य चित्रपटांमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. ‘बाहुबली’ या मालिकेने त्यांची जगात वेगळी ओळख निर्माण केली. सध्या अभिनेता ‘प्रोजेक्ट के’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण यादरम्यान अशीही बातमी येत आहे की, तो चित्रपटातील त्याची सह-अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या छेडछाडीमुळे नाराज झाला आहे आणि त्यामुळे शूटिंगमध्ये अडचण येत आहे.

‘बाहुबली’ नंतर अभिनेत्याचे प्रभासचे चित्रपट कमाल दाखवू शकले नाहीत. ‘साहो’ आणि ‘राधे श्याम’ चित्रपटाची जोरदार चर्चा  झाली होती पण या चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर कमाई केली नाही. मात्र आताही प्रभासकडे कामाची कमतरता नाही. सध्या तो ‘सालार’ आणि ‘प्रोजेक्ट के’ वर काम करत आहे. याशिवाय तो ‘आदिपुरुष’ चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –
प्रभासने ‘तो’ निर्णय घेतला असता, तर ‘बाहुबली’ने केली नसती 35 तासात 100 कोटींची कमाई
मलायका अरोरा झाली धोक्याची शिकार; अभिनेत्रीच्या बहिणीनेच तिच्या नकळत केलं ‘असं’ काही

हे देखील वाचा