Saturday, December 7, 2024
Home बॉलीवूड सारा अली खानच्या ‘ए मेरे वतन’ ची रिलीज डेट जाहीर, ‘या’ दिवशी ओटीटीवर होणार रिलीझ

सारा अली खानच्या ‘ए मेरे वतन’ ची रिलीज डेट जाहीर, ‘या’ दिवशी ओटीटीवर होणार रिलीझ

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री सारा अली खान (sara ali khan) नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असते. पण ती सध्या तिच्या नव्या चित्रपटामुळं चर्चेत आली आहे. एका महिला स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारत साराने भारतीयांचे मन जिंकले आहे. काही दिवासपूर्वी तिनं तिच लुक शेअर करत नव्या चित्रपटासंदर्भात माहिती दिली होती. ‘ऐ वतन मेरे वतन’ असं या चित्रपटाचं नावं आहे. तर नुकतंच एक पोस्ट शेअर करत साराने नव्या चित्रपटाची डेट रिलीज केली आहे.

‘ऐ वतन मेरे वतन’ या चित्रपटातील साराचा फर्स्ट लूक रिलीज होताच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात सारा अली खान एका महिला स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारत आहे. साराने ‘ऐ वतन मेरे वतन’ या चित्रपटाची घोषणा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मनं केली. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या व्हिडीओमधील साराच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले होते.

तिचा हा चित्रपट २१ मार्चला रिलीज होणार आहे. या चित्रपटात सारा स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सीक्रेट रेडिओ सेवेच्या माध्यमातून 1942 मध्ये मुंबईच्या गोवालिया टँक मैदानात सुरू झालेल्या भारत छोडो आंदोलनात उषा मेहता यांची महत्त्वाची भूमिका होती. आता सारा त्यांची भूमिका साकारणार आहे.

सारासोबत या चित्रपटामध्ये सचिन खेडेकर, अभय वर्मा, स्पर्श श्रीवास्तव, एलेक्स नील आणि आनंद तिवारी हे सेलेब्स मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. . या चित्रपटाची पटकथा दरब फारुकी आणि कन्नन अय्यर यांनी लिहिली आहे. तसेच या चित्रपटाचं दिग्दर्शन कन्नन अय्यर यांनी केलं आहे.

तर काही दिवसांपूर्वी साराने तिचा या चित्रपटातील लूक शेअर केला होता. तेव्हापासून सोशल मीडियावर साराच्या या लूकची प्रचंड चर्चा आहे. व्हिडिओत ती पांढऱ्या रंगाच्या साडीत दिसतेय. तिने केसांची वेणी बांधली आहे आणि डोक्याला टिकली लावली आहे. ती हुबेहूब स्वातंत्र्यपूर्व काळातील एक स्त्री दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. 23 जानेवारीला तिनं या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला होता.

या टीझरमध्ये सारा एका रुममध्ये स्वत: ला बंद करून घेते आणि बोलते ‘अंग्रेजों को लग रहा है कि उन्होंने क्विट इंडिया का सिर कुचल दिया है. लेकिन आजाद आवाजें कैद नहीं होती. ये है हिंदुस्तान की आवाज है, हिंदुस्तान में कहीं से, कहीं पे हिंदुस्तान में.’ त्यानंतर अचानाक दरवाजावर कोणी तरी जोर जोरात ठोठावतं. हे पाहून सारा घाबरते हे आपण टीझरमध्ये पाहायला मिळते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

चोर निघाला दिलदार! मणिकंदन यांच्या घरातून चोरीला गेलेला राष्ट्रीय पुरस्कार, चोराने माफी मागून परतवला
रुह बाबा करणार दोन भुतांचा सामना, विद्या बालनसोबत माधुरी दीक्षितची \भूल भुलैया 3′ मध्ये वर्णी

 

हे देखील वाचा