बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या बिनधास्त स्टाइलसाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि तिचे सुंदर फोटो शेअर करत असते, जे चाहत्यांना खूप आवडतात. अशा परिस्थितीत, साराची फॅन फॉलोविंग चित्रपटांपेक्षा सोशल मीडियामुळे जास्त आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. सारा कोणत्याही मुद्द्यावर आपले मत उघडपणे मांडते. सारा तिचे आई-वडील आणि त्यांच्या घटस्फोटाबद्दलही उघडपणे बोलली आहे. सैफपासून वेगळे झाल्यानंतर, अमृताने दोन्ही मुलांचा सांभाळ केला. अशा परिस्थितीत सारा तिच्या आईच्या खूप जवळ आहे.
अलीकडेच साराने आणखी एक खुलासा केला आहे, ज्यात तिने ती लहानपणी आई-वडिलांबद्दल काय विचार करायची, हे सांगितले आहे. खरं तर, साराला वाटायचे की, तिचे वडील सैफ अली खान फक्त शिवीगाळ करतात आणि आई अमृता पॉर्न साइट चालवते. तिला वाटायचे की सैफ आणि अमृता खऱ्या आयुष्यात वाईट लोक आहेत. सारा तिच्या आई-वडिलांबद्दल असा विचार का करत होती, हे देखील तिने सांगितले आहे. (sara ali khan revealed that in childhood days she though her parents are negative person)
खरंतर साराने लहानपणी तिच्या वडिलांचा ‘ओमकारा’ हा चित्रपट पाहिला होता. सैफने २००६ मध्ये आलेल्या या चित्रपटात लंगडा त्यागी नावाच्या खलनायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सैफशिवाय अजय देवगण, करीना कपूर खान, कोंकणा सेन शर्मा आणि विवेक ओबेरॉय दिसले होते. त्याचवेळी २००५ मध्ये आलेल्या ‘कलयुग’ या थ्रिलर चित्रपटात अमृता सिंग, कुणाल खेमूसोबत अनेक कलाकार दिसले होते.
एका मुलाखतीत साराने सांगितले होते की, हे दोन चित्रपट पाहिल्यानंतर तिच्यावर काय परिणाम झाला. सारा म्हणाली की, “मला फक्त एवढेच आठवते की, माझ्या लहानपणी मी ‘ओमकारा’ आणि ‘कलयुग’ पाहिले होते आणि मला वाटू लागले होते की, माझे पालक किती वाईट आहेत.” ती म्हणाली की, “मला असे वाटायचे की अब्बा चुकीची भाषा वापरतात आणि आई पॉर्न साइट चालवते आणि त्यावेळी हे अजिबात मजेदार नव्हते.”
सारा पुढे म्हणाली, “मला आणखी आश्चर्य वाटले, जेव्हा दोघांना एकाच वर्षी नकारात्मक भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले होते.” सारा म्हणाली, “मी नेहमीच माझ्या आईची लाडकी मुलगी राहिली आहे. मी नेहमी गोष्टींबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करते आणि नेहमी प्रेरित राहते. हे सर्व गुण मी कोणत्याही ट्यूटरकडून, घरच्या किंवा जिमच्या ट्रेनरकडून शिकलेले नाही.”
साराने ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. ती ‘सिम्बा’, ‘लव्ह आज कल २’ आणि ‘कुली नंबर १’ या चित्रपटांत दिसली आहे. सारा लवकरच ‘अतरंगी रे’मध्ये दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘एका कार्यक्रमात सारा हिरोइनसारखे नखरे करत होती’, जान्हवी कपूरने केला खुलासा
-गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे साराला पडले महागात, सोशल मीडियावर होतेय ट्रोल
-Video: सारा अली खान कारमध्ये बसताच गरजू महिलेने मागितली मदत, पाहा काय केलं अभिनेत्रीने










