Friday, July 5, 2024

‘जलेबी बेबी’ गाण्यावर वेगवेगळ्या अंदाजात थिरकली सारा अली खान, शेअर केली फिल्मफेअर अवॉर्डमधील डान्सची झलक

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री सारा अली खान ही तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टाईल आणि अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. ती तिच्या जोरदार डान्स स्टाईलने देखील सर्वत्र ओळखली जाते. तिने अभिनयासोबतच तिच्या डान्सने सगळ्यांची मन जिंकून घेतली आहे. या गोष्टीची खात्री पटते तो तिचा हा व्हिडिओ बघून. सारा अली खानने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तिने फिल्मफेअर अवॉर्डमधील तिच्या डान्सची झलक दाखवली आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेला हा छोटासा डान्स व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे.

सारा अली खानने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘जलेबी बेबी’ हे गाणे चालू आहे. या व्हिडिओमध्ये बघू शकता की, सारा या गाण्यात वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहे. फिल्मफेअर अवॉर्ड 2021 हा शो येत्या 11 एप्रिलला टेलिकास्ट केला जाणार आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या या शोमधील डान्सची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

सारा अली खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, नुकताच तिचा ‘कुली नंबर 1’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सारा अली खान वरुण धवनसोबत मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटातून त्यांच्या जोडीला देखील चाहत्यांकडून खूप पसंती आणि प्रेम मिळत आहे.

याव्यतिरिक्त सारा लवकरच तिच्या ‘अतरंगी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती अक्षय कुमार आणि धनुष यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. साराने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दोन कोटी रुपये की, ६ मुलींसोबत हॉलिडे?’, प्रियांकाच्या प्रश्नावर कपिलने दिले जबरदस्त प्रत्युत्तर, ऐकून तुम्हीही खदखदून हसाल

-याला म्हणतात कहर! भोजपुरी स्टार अंकुश आणि शिल्पी यांच्या गाण्याचा राडा, दोन महिन्यातच मिळालेे १८ कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज

-अनुपम खेर यांनी केला रस्त्यावर गाणाऱ्या मुलांचा सुंदर व्हिडिओ शेअर, म्हणाले ‘मला त्यांंना जग…’

हे देखील वाचा