Monday, June 17, 2024

मी तिला आंटी म्हणू का? साराने करिनाबाबत हा प्रश्न विचारताच सैफला बसला शॉक! पाहा मग काय म्हणते सारा करिनाला?

बॉलिवूडमधील स्टार्सचे एकापेक्षा जास्त विवाह होणे, याबद्दल आता कुणालाही तितकेसे कुतूहल राहिलेले नाही. परंतू, या दोन लग्नांमुळे नातेसंबंधाची जी काही खिचडी शिजते, त्याच्या चर्चा मात्र चाहत्यांमध्ये चांगल्याच रंगतात. त्यातही सैफ आणि करिना व त्यांचे कुटुंब यांच्याबाबत तर सतत काहीना काही चर्चा सुरूच असते.

आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की, करिना ही सैफ अली खानची दुसरी पत्नी आहे. तसेच, करिना ही आता दुसऱ्यांदा प्रेग्नंट असून या अगोदर या जोडप्याला तैमुर नावाचं एक अपत्य आहे. परंतू, सैफला त्याच्या पहिल्या पत्नीपासून म्हणजेच ‘अमृता सिंह’ हिच्यापासूनन देखील काही अपत्ये आहेत. सारा खान ही देखील सैफच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी आहे.

सारा अली खान हे नाव सिनेमा जगात असलेले फार कमी लोकांना ठाऊक होतं. करिनासोबत लग्न झाल्यानंतर सारा आणि तिच्यामधील नाते संबंध कसे आहेत, याची एक वेगळीच गंमत तिने स्वतः सांगितलेली आहे.

कॉफी विथ करण या कार्यक्रमात सैफ अली खान आणि सारा हे दोघे पाहुणे म्हणून गेले होते. त्यावेळी करण जोहर ने सारा ला विचारलेल्या प्रश्नाला तीने दिलखुलास उत्तरे दिली होती. यादरम्यान एका प्रश्नाचं उत्तर देताना सारा म्हणाली की, ‘अब्बाचे आणि करिनाचे लग्न होण्यापूर्वी करिना माझ्यासोबत येऊन मोकळेपणानं बोलायची.  मला सांगायची की, तुला अगोदरच एक आई आहे त्यामुळे तू मला आई वगैरे न समजता तुझी मैत्रीण समज.  आपण दोघीही चांगल्या मैत्रिणी होऊ शकतो.  आज पाहायला गेलो तर आम्ही चांगल्या मैत्रिणी आहोत.’

सारा पुढे म्हणाली की, “जेव्हा मला करिनाला काय हाक मारावी, असा प्रश्न पडला. तेव्हा मी अब्बाना (सैफला) विचारलं. की, मी तिला काय म्हणून हाक मारू, करिना की करिना आंटी? तेव्हा त्यांनी मला, तू तिला अजिबात आंटी वगैरे म्हणू नकोस. म्हणून मी मी तिला ‘के’ किंवा ‘करीना’ अशी हाक मारायला लागले”, असे साराने सांगितले होते.

वरुण धवन आणि सारा अली खानचा कुली नंबर १ हा नवा सिनेमा येत्या काही दिवसात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्याचा ट्रेलर सुद्धा नुकताच यु ट्यूब वर प्रदर्शित झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सैफ, सारा, करिना यांच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

हे देखील वाचा