Friday, July 5, 2024

‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीचा रस्ते अपघातात दुर्दैवी अंत

टेलिव्हिजन विश्वात एक दुःखद बातमी समोर येत आहे. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेत जस्मिनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री वैभवी उपाध्यायचे दुःखद निधन झाले आहे. वैभवीचा मृत्यू हिमाचलमध्ये एका कार अपघातात झाला आहे. तिचे चंदिगढ येथे असणाऱ्या कुटुंबातील लोकं आता तिचे पार्थिव मुंबईमध्ये घेऊन येत आहे. आज मुंबईमध्ये वैभवीवर अंतिम संस्कार केले जाणार आहे.

साराभाई व्हर्सेस साराभाई टेक 2 मध्ये वैभवीसोबत काम केलेल्या निर्माता आणि अभिनेता असलेल्या जेडी मजेठिया यांनी ही बातमी खरी असल्याचे सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, गाडी वाळवताना गाडी दरीत कोसळली. गाडीमध्ये वैभवीसोबत तिचा होणार नवरा देखील होता. तो गंभीर जखमी आहे.

जेडी मजेठिया यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, ही दुर्दैवी घटना उत्तर भारतात झाली. जेडी यांनी लिहिले, “जीवन खूपच अप्रत्याशित आहे. एक उत्तम अभिनेत्री, उत्तम मैत्रीण वैभवी उपाध्याय, जिला साराभाई व्हर्सेस साराभाई मध्ये जस्मिन या भूमिकेसाठी ओळखले जाते, तिचे निधन झाले आहे. उत्तर भारतात झालेल्या एका अपघाताची ती शिकार झाली. तिचे कुटुंबीय तिचे पार्थिव मुंबईमध्ये आणत आहे. तिच्यावर २४ मे रोजी अंतिम संस्कार केले जाणार आहे.”

दरम्यान वैभवीने २०२० साली आलेल्या दीपिका पदुकोणच्या ‘छपाक’ आणि ‘तिमिर’ (2023) या चित्रपटात काम केले होते. ती गुजराती रंगभूमीवर सर्किट मध्ये लोकप्रिय आणि प्रसिद्ध होरी. तिने साराभाई व्हर्सेस साराभाईसोबतच ‘क्या कसूर है अमला का’ आणि डिजिटल सीरीज असलेल्या ‘प्लीज फाइंड अटैच्ड’ यात काम केले होते. शिवाय ती हिस्ट्री चॅनेलवर अनेक शोचे सूत्रसंचालन करताना देखील दिसली होती. यात तिने भारतातील विविध ऐतिहासिक वास्तुंना भेट देऊन त्याचे महत्व सांगितले आहे.

हे देखील वाचा