Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

भीम गीतांचा आवाज हरपला; शिंदे कुटुंबातील प्रसिद्ध गायकाचं निधन

संगीत विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. संगीत विश्वात आपण कायम ठसा उमटवणारे कुटुंब म्हणजे शिंदे कुटूंब होय. या कुटुंबियांनी आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. शिदें कुटूंबातील सुप्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांनी त्यांच्या आवाजने अनेक प्रेक्षकांच्या ह्रदयात जागा निर्माण केली आहे. याच शिदें कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळा आहे. याबाबद गायक आणि अभिनेता उत्कर्ष शिंदेने माहिती दिली आहे.

उत्कर्षने पोस्ट करताना लिहिले की, “तुझ्यासारखा कलाकार होणे नाही. आम्हाला तुझी कायम आठवण येत राहिल.” स्वरसम्राट प्रल्हाद शिंदेंचे नातू, उत्तम ढोलक वादक सार्थक दिनकर शिंदे (Sarthak Shinde) यांचे आकस्मित निधन झालं आहे. प्रत्येक कलाकृतीवर मनापासून दाद देणारा, सतत हसतमुख, उत्तम कव्वाली ढोलक वादक, शिंदे शाहीतील एक चांगला कलाकार ‘सार्थक दिनकर शिंदे’चे निधन झालं आहे.

सार्थक हा प्रल्हाद शिंदे यांचा नातू आणि आनंद शिंदे यांचा पुतण्या होता. त्याने 31 जुलै 20213 अखेरचा श्वास घेतला आहे. सार्थक शिंदे याचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची माहिती समोर आलेआहे. सार्थक तबला आणि ढोलवादक म्हणूनही खुप लोकप्रिय होता.

दिनकर शिंदे यांचा सार्थक हा मुलगा होता. सार्थक हा भीम गीतांच्या कार्यक्रमांसाठी खुप लोकप्रिय असुन तो आवाजाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला आहे. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. सार्थक शिंदेच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. शिंदेशाहीतला एक तारा निखळला असे अनेकांनी म्हटले आहे. (Sarthak Dinkar Shinde, grandson of Pralhad Shinde and nephew of Anand Shinde, passed away due to heart attack.)

अधिक वाचा- 
देसाईंच्या निधनानंतर मनसे नेत्याचे धक्कादायक विधान! म्हणाले, ‘शूटिंग रद्द केल्या जायच्या…’
आहा… कडकच ना! गुडघ्यावर बसून चाहत्याने श्रद्धाला केला प्रपोज, नेटकरी म्हणाले, ‘शाळेत जाऊन अभ्यास कर…’

हे देखील वाचा