Thursday, June 13, 2024

आहा… कडकच ना! गुडघ्यावर बसून चाहत्याने श्रद्धाला केला प्रपोज, नेटकरी म्हणाले, ‘शाळेत जाऊन अभ्यास कर…’

आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी चाहते तुडुंब गर्दी करतात. काही चाहते तर आवडता कलाकार दिसताच त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी, त्याच्यासोबत बोलण्यासाठी धावत सुटतात. आपल्या आवडत्या कलाकारासाठी चाहते कुठल्याही थराला जातात. जर आवडता कलाकार अभिनेत्री असेल, तर चाहते कधी-कधी प्रपोजही करून टाकतात. असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही नुकतीच एका विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी चाहत्याने श्रद्धा कपूरला प्रपोज केले. यादरम्यानचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कमेंट्सचा महापूर आला आहे.

चाहत्याने श्रद्धा कपूरला प्रपोज केले
आपल्या आलिशान मर्सिडीज बेंझ कारमधून विमानतळावर पोहोचताच श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट आणि फुल स्लीव्हज टॉपमध्ये दिसली. हा लूक तिने स्नीकरसोबत पूर्ण केला होता. विमानतळावर पोहोचताच एका चाहत्याने श्रद्धा कपूरला प्रपोज केले (Fan Proposed Shraddha Kapoor).

व्हिडिओ जोरदार व्हायरल
या व्हिडिओत दिसते की, श्रद्धा जशी गाडीतून उतरते, तसा तिचा चाहता गुलाबाचा पुष्पगुच्छ घेऊन येतो. यावेळी तो चक्क गुडघ्यावर बसून प्रपोज करतो. श्रद्धाही आपल्या चाहत्याला खुश करते आणि त्याच्यासोबत हातमिळवणी करून पुढे निघून जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

नेटकऱ्यांच्या लक्षवेधी कमेंट्स
एका युजरने लिहिले की, “अरे हा लप्पू झिंगूसारखा मुलगा सचिन कुठून आला.” तसेच आणखी एकाने लिहिले की, “श्रद्धा किती नम्र आणि फिट आहे.” एकाने असेही लिहिले की, “माझी हाफ गर्लफ्रेंड बनून जा.” याव्यतिरिक्त एक जण असेही म्हणाला की, “शाळेत जाऊन अभ्यास कर भावा, इतक्या कमी वयात सेलिब्रिटीला पटवतोय.”

आगामी सिनेमा
श्रद्धा कपूरच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर ती आगामी ‘स्त्री 2’ या सिनेमात दिसणार आहे. अभिनेत्री नुकतीच या सिनेमाच्या पहिल्या शेड्यूलची शूटिंग करून परतली होती. निर्मात्यांनीही अलीकडेच सिनेमाच्या सीक्वेलची घोषणा केली होती. याद्वारे त्यांनी हा सिनेमा ऑगस्ट 2024मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले होते. (actress shraddha kapoor fan proposed her goes down on knees video viral on social media)

हेही वाचा-
ब्रेकिंग! अभिनेत्री अदा शर्माची अचानक बिघडली तब्येत, धक्कादायक कारण आले समोर
दिग्दर्शकाच्या निधनामुळे अक्षय कुमारला धक्का! उचलले ‘हे’ पाऊल, लगेच वाचा

हे देखील वाचा