हिंदी चित्रपट आणि मालिका क्षेत्रात यंदा अनेक अभिनेता आणि अभिनेत्री पालक होणार आहेत. याआधी अनेक टीव्ही अभिनेत्रींनी याबाबतची माहिती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली आहे. या यादीमध्ये आता अभिनेत्री दीपिका कक्करचेही (Dipika Kakar) नाव सामील झाले आहे. तिच्या चाहत्यांनी दीपिका प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू केली आहे. मात्र अभिनेत्रीने यावर वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे.
दीपिका कक्कर ही मालिका क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या दमदार अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. दीपिकाला ‘ससुराल सिमर का’ या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेतील दमदार अभिनयामुळे तिला घराघरात प्रसिद्धी मिळाली होती. तिने २०१८ मध्ये शोएब इब्राहिमसोबत लग्न केले होते. त्याआधी अनेक वर्ष दोघांचे प्रेम प्रकरण सुरू होते. लग्न केल्यापासून दोघांचेही चाहते त्यांच्याकडे गुड न्यूज देण्याची मागणी करत आहेत. काही दिवसांपूर्वी दीपिका प्रेग्नंट असल्याचाही बातम्या सुरू झाल्या होत्या. मात्र याबद्दल दीपिकाने खुलासा करत असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले होते.
ही चर्चा सुरू व्हायला मुख्य कारण म्हणजे दीपिका आणि शोएबचे ‘रब ने मिलाई धडकन’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. तिच्या चाहत्यांनी या गाण्यात दीपिका आपले पोट लपवत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळेच चाहत्यांनी ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरू केल्या आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणावर खुलासा करताना दीपिकाने प्रतिक्रिया दिली की, “वाट पाहा, सध्या तरी असे काहीही नाही, आणि असे काही असल्यास तुम्हाला नक्की सांगेन.” याआधी शोएबनेही या चर्चेचा खुलासा करताना या सगळ्या अफवा असल्याचे सांगितले. सोबतच आम्ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितली आहे, ही गोष्टसुद्धा लपवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. दीपिका आणि शोएब दोघेही सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. दोघांची जोडी त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. त्यांनी आपला एक युट्यूब चॅनेल सुद्धा सुरू केला आहे. ज्यावरून ते त्यांच्या दैनंदिन आयुष्याबद्दल सांगत असतात.
हेही वाचा –










