Tuesday, June 6, 2023

सतीश कौशिक यांनी एअरलाइनवर लावले गंभीर आरोप; म्हणाले, ‘पैशांसाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करतायेत’

प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माते आणि अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांनी गो फर्स्ट एअरलाइनवर अन्यायकारकपणे पैसे कमावल्याचा आरोप केला आहे. सतीश यांनी फ्लाइटमधील एका सीटसाठी आपल्याला कशी हीन वागणूक दिली गेली, हे सांगितले. एकामागून एक पोस्ट करत त्यांनी संपूर्ण घटना तपशीलवार सांगितली आहे.

सतीश कौशिक यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एअरलाइन्स फ्लाइट प्रवासाशी संबंधित घटनेचे तपशीलवार वर्णन करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “हे खूप दुःखद आहे की, गो फर्स्ट एअरवेजने प्रवाशांकडून पैसे कमवण्यासाठी चुकीचा मार्ग शोधला आहे. माझ्या ऑफिसमधील २ सीट्स (सतीश कौशिक/अजय राय) पहिल्या रांगेतील मधल्या सीटसह २५,००० रुपयांना बुक केल्या होत्या. पण माझ्या ऑफिसने पैसे भरले असताना या लोकांनी ती सीट दुसऱ्या प्रवाशाला विकली.” (satish kaushik accuses go first airline says its selling seats)

सतीश कौशिक यांनी पुढील ट्विटमध्ये लिहिले, “हे ठीक आहे का? प्रवाशाला त्रास देऊन अधिक पैसे कमवण्याचा हा मार्ग आहे का? पैसे परत मिळणे ही बाब नसून, तुमचे ऐकूण घेण्याची बाब आहे. मी फ्लाइट थांबवू शकलो असतो , पण मी तसे केले नाही. कारण बाकीचे बघून मला वाटले की, सगळे आधीच ३ तास ​​वाट पाहत आहेत.”

एअरलाइनने पैसे परत करण्यास दिला नकार
सतीशने आपल्या पुढच्या ट्वीटमध्ये लिहिले की, जेव्हा मदत मागितली गेली तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, प्रवाशी पुढच्या फ्लाइटने जाईल. पण प्रवासी त्याच फ्लाइटचा होता. सतीशने लिहिले की, “जेव्हा त्या प्रवाशाला जागा मिळाली नाही, तेव्हा फ्लाइट थांबवण्यात आली. त्यानंतर मी त्याला सीट देण्याचे ठरवले. चांगली गोष्ट म्हणजे, फ्लाइट अटेंडंट आणि एअर होस्टेसने यासाठी माझे आभार मानले. त्या सीटचे माझे पैसे परत मिळतील, असेही त्यांनी सांगितले. पण मी त्यांना सांगितले की असे कधीच होणार नाही. आणि परिणामी एअरलाइनने रिफंड देण्यास नकार दिला.”

सतीश कौशिक यांचे हे ट्वीट्स सोशम मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. युजर्स यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. मात्र अद्याप एअरलाइनकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा