Sunday, May 19, 2024

जेव्हा गर्भवती नीना गुप्ता यांना साथ द्यायला पुढे आले होते सतीश कौशिक; मुलीला त्यांचे नाव द्यायलाही झाले होते तयार

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या दमदार अभिनयसाठी ओळखल्या जातात. त्यांचा प्रत्येक अंदाज त्यांच्या चाहत्यांना आवडता असतो. त्यांची नुकतेच ‘सच कहू तो’ ही ऑटो बायोग्राफी लॉन्च झाली आहे. त्यांनी या ऑटो बायोग्राफीमध्ये अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यांनी यामध्ये खुलासा केला आहे की, फिल्ममेकर सतीश कौशिक यांनी त्यांना प्रपोज केले होते.

नीना गुप्ता (neena guptas) या क्रिकेटर विवियन रिचर्ड्स याच्या सोबत रिलेशन मध्ये होत्या. ते दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. त्या दरम्यान नीना या प्रेग्नेंट होत्या. त्यानंतर ते दोघे वेगळे झाले. त्यांनी त्या मुलाला जन्म आणि त्याचे पालन देखील एकटीने केले.

हाती आलेल्या माहितीनुसार, नीना गुप्ता जेव्हा प्रेग्नेंट होत्या तेव्हा सतीश कौशिक त्यांना साथ देण्यासाठी तयार होते. सतीश कौशिक यांनी त्यांना सांगितले होते की, “त्यांचे बाळ सावळ्या रंगाचे असेल तर ती म्हणू शकते की, ते तिचे बाळ आहे आणि ते दोघे लग्न करू शकतात. कोणालाही या बद्दल काहीच समजणार नाही.” पण तेव्हा नीना यांनी एकटी राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी स्वतः च त्यांच्या बाळाचे पालन पोषण केले. (Satish Kaushik was ready to give his name to Neena Gupta’s daughter)

नीना गुप्ता यांनी वयाच्या ५० व्या वर्षी लग्न केले. त्यांनी त्यांची मुलगी मसाबा हिच्या समोर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी २००८ मध्ये विवेक मेहरा सोबत लग्न केले. त्या त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप खुश आहेत. त्या आता त्यांच्या पतीसोबत मुक्तेश्वरमध्ये आहेत.

ज्या प्रकारे त्यांनी त्यांच्या आयुष्याला दुसरी संधी दिली त्याच प्रकारे त्यांनी अभिनय क्षेत्रात अशीच पुन्हा एकदा मजल मारली आहे. त्यांनी आयुष्मान खुरानाच्या ‘बधाई हो’ या चित्रपटात चांगलीच धमाल केली. यानंतर त्यांच्याकडे अनेक प्रोजेक्ट आले.

त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्या लवकरच अमिताभ बच्चन यांच्या सोबत ‘गुड बाय’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्या सोबत रश्मिका मंदाना दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली आहे. तसेच नीना गुप्ता या सोशल मीडियावर अनेकदा व्हिडिओ शेअर करत असतात. जे बऱ्याचदा व्हायरलही होतात.(satish kaushik was ready to give his name to neena guptas daughter)

अधिक वाचा-
जान्हवी कपूरने गाेल्डन ड्रेसमध्ये केले ग्लॅमरस फाेटाेशूट, एकदा पाहाच

शिव ठाकरेची एक्स गर्लफ्रेंड अडकली विवाह बंधनात? जाणून घ्या सत्य

हे देखील वाचा