Thursday, April 25, 2024

जीवलगा! समंथाच्या आजाराची माहिती मिळताच नागा चैतन्यने केला फोन; म्हणाला, ‘काही मदत…’

साऊथ लाेकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य हे विभक्त झाले असले तरी यांच्यामध्ये सर्व काही ठीक चालले आहे. हे दाेघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. अलीकडेच, सोशल मीडियावर, समंथाने तिचा मायोसोटिस नावाचा दुर्मिळ आजार उघडकीस आणला, ज्यानंतर चाहते आणि हितचिंतक तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. या दरम्यान, नागार्जुन आणि नागा चैतन्य यांनी समंथाला वैयक्तिकरित्या भेटल्याच्या बातम्याही समाेर आल्या होत्या. मात्र, नंतर त्या केवळ अफवा असल्याचे सांगण्यात आले. अशातच आता असे ऐकण्यात येत आहे की, अभिनेत्रीचा एक्स पती प्रोफेशनल कमिटमेंट्समुळे सामंथाला भेटू शकला नसला तरी त्याने फोनद्वारे समंथाची प्रकृती जाणून घेतली असेल.

माध्यमातील वृत्तानुसार, नागा चैतन्य (Naga Chaitanya) याने समंथा (Samantha Ruth Prabhu) बरी आहे की, नाही हे पाहण्यासाठी फोनद्वारे तिच्याशी संपर्क साधला. तिला काही मदत हवी आहे का, असेही समंथाला विचारण्यात आले. विभक्त झाल्यानंतर त्यांच्यात झालेल्या बातचीत वरून असे दिसून येते की, ते त्यांचे जुने नाते स्वीकारण्यासाठी  पूर्णपणे मॅच्योर आहेत. अलीकडेच एका मुलाखती दरम्यान नागा चैतन्यने खुलासा केला हाेता की, “ताे जेव्हाही समंथाला भेटताे तेव्हा ताे तिला प्रेमाने मिठी मारताे.”

मात्र, समांथाने जुने नाते स्वीकारल्याचे कोणतेही संकेत नाहीत. सध्या तिला लवकरात लवकर बरे होऊन कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. तिने भरपूर चित्रपटाचे प्राेजेक्ट साइन केले आहेत. ज्यासाठी तिला मोठी रक्कम देखील मिळाली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, सध्या समंथा तिच्या आगामी यशोदा चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे आणि या दरम्यान तिच्या आजारावर उपचारही सुरू आहेत.

समंथाच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले तर, समंथाला ‘यशोदा’च्या ट्रेलरद्वारे उदंड प्रतिसाद मिळाला आणि सर्वजण तिच्या ऍक्शन परफाॅर्मन्सचे चाहते झाले. सध्या समंथा राज आणि डीकेच्या सिटाडेल या वेब सीरिजचीही तयारी करत आहे, ज्यामध्ये मुख्य भूमिकेत वरुण धवन आहे. याव्यतिरिक्त ती विजय देवरकाेंडसाेबत कुशीमध्येही दिसणार आहे. (actress samantha ruth prabhu gets a call from ex husband naga chaitanya after she discloses of being diagnosed with myosotis)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘आदिपुरुष’बाबत निर्मात्यांनी घेतला हा मोठा निर्णय
‘ही’ अभिनेत्री लढतेय कॅन्सरसोबत, सोशल मीडियावर केस फोटो आत्मविश्वासाने केले पोस्ट

हे देखील वाचा