बॉलिवूडच्या सिंघमचा राजेशाही थाट! खासगी विमान ते कोट्यवधींच्या गाड्या, वाचा अजय देवगणची श्रीमंती

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण हा आजच्या घडीला देशातील टॉप ५ अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याची कमाई इतर अभिनेत्यांसारखी दिसत जरी नसली, तरीही वास्तव मात्र वेगळंच आहे.


बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण हा आजच्या घडीला देशातील टॉप ५ अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याची कमाई इतर अभिनेत्यांसारखी दिसत जरी नसली, तरीही वास्तव मात्र वेगळंच आहे. अजय देवगण हा एखाद्या राजाप्रमाणेच त्याचं आयुष्य जगत आहे.

ही ओळख, हा पैसा हे सगळं त्याने स्वतःच्या कष्टाच्या जोरावर मिळवलं आहे. करियरच्या सुरुवातीच्या काळात अजयने खूप काम केलं, खूप मेहनत घेतली. त्याचेच परिणाम म्हणून अभिनेत्री काजोलसोबत तो राजेशाही थाटात आयुष्य जगतोय.

दरवर्षी अजय देवगण कमालीचे चित्रपट बनवून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. २०१९ साली फोर्ब्जॉच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटी व्यक्तींच्या यादीत अजय देवगण हा बाराव्या स्थानावर होता. सरासरी अभिनेता म्हणून अजय देवगण हा ९४ कोटींची कमाई करतो, असे वृत्त आहे.

आपल्या कष्टाच्या जोरावर मेहनतीच्या पैशांनी अजय देवगणकडे काही खास गोष्टीचं कलेक्शन आहे. अशा गोष्टी ज्या फार क्वचितच लोकांकडे आपल्याला पाहायला मिळतात. चला मग पाहुयात त्या गोष्टी ज्या अजयसाठी खास आहेत.

मासेराती क्वाट्रोपोर्ट

अजय देवगन हा बॉलीवूडचा पहिला अभिनेता होता, ज्याने २००८ मध्ये मासेराती क्वाट्रोपोर्ट ही कार घेतली होती. कार्टोकच्या वृत्तानुसार या कारची किंमत १.५ कोटींपेक्षा जास्त आहे. याशिवाय, अजय देवगणकडे एक बीएमडब्ल्यू Z4, ऑडी Q7 आणि एक ऑडी A5 ही स्पोर्टबॅक देखील आहे जी त्याने कॉफी विथ करण सिझन ६ मध्ये जिंकली होती.

Ajay Devgn Car 1
Ajay Devgn Car 1

रोल्स रॉयस कलिनन

२०१९ मध्ये अजय ने रोल्स रॉयस कलिनन ही गाडी विकत घेतली. ही गाडी अजय ने जवळपास ६.५ कोटींना खरेदी केली होती. अजय ने इतकी महागडी गाडी घेतली आहे म्हटल्यावर नक्कीच ती खास असणार. या गाडीला कुठेही न्या; कोणत्याही वातावरणात, कोणत्याही परिस्थिततीमध्ये परंतु ही गाडी आत बसलेल्या प्रवाशांना यातील कशाचीही झळ बसून देत नाही.अगदी आरामदायी प्रवास ही गाडी घडवून आणते.

हॉकर८००

अजय देवगण ने २०१० मध्ये स्वतःसाठी एक पाच ते सहा माणसांच्या बसण्याची व्यवस्था असलेलं हॉकर८०० हे प्रायव्हेट जेट विकत घेतलं. या जेटची किंमतच सुमारे ८४ कोटी रुपये इतकी आहे. इतकंच नाही तर अजय देवगण हा बॉलिवूडचा असा पहिला सेलिब्रिटी आहे ज्याने स्वतःचं एक वैयक्तिक विमानच खरेदी केलं आहे. या जेट मधून अजय आणि त्याचं कुटुंब हे फिरायला जातं तर सहकऱ्यांसोबत अजय बऱ्याचदा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जात असतो.

वैयक्तिक व्हॅनिटी व्हॅन

अजय देवगण अशा व्हॅनिटी व्हॅनचा मालक आहे. जिला आपण राजवाडा म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. त्याने स्वतःसाठी ही खास व्हॅनिटी व्हॅन तयार करून घेतली आहे. जिची किंमत अजय ने कधीच जाहीर केली नाही. अजयच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये एक लॅवेटरी, एक खोली, एक कार्यालय, एक स्वयंपाकघर, एक मोठा स्क्रीन टीव्ही तसंच एक छोटेखानी जिम आणि एक मोबाइल जिम देखील आहे.

Ajay Devgan Home
Ajay Devgan Home

लंडनमधील राजेशाही घर

अजय देवगन मुंबईतील शिवशक्ती या त्याच्या बंगल्यात राहतो. लंडनमध्येदेखील त्याच्याकडे ५४ कोटींची स्वतंत्र मालमत्ता आहे, ज्यात तो कधीकधी जाऊन राहत असतो.


Leave A Reply

Your email address will not be published.