छोट्या पडद्यावरून चित्रपटात पदार्पण करण्यासाठी कलाकारांना अनेक वर्ष मेहनत करावी लागते, अभिनयाच्या कसोटीला उतरावे लागते. पण काही अभिनेत्री अशा असतात की, त्या खूप कमी कालावधीत त्यांचा हा टप्पा पार करतात. याच यादीतील एक नाव म्हणजे सायली संजीव. ‘काहे दिया परदेश’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीने आता चित्रपटसृष्टीत तिचे एक अढळ स्थान निर्माण केले आहे. तिच्या अभिनयासोबत तिच्या सौंदर्याचे नेहमीच कौतुक होत असते. सोशल मीडियावर ती चाहत्यांशी जोडून असते. अशातच तिचे साडीमधील काही फोटो समोर आले आहेत.
सायलीने नुकतेच सोशल मीडियावर काही साडीमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने हिरव्या रंगाची प्लेन साडी नेसली आहे. तसेच यावर तिने पांढऱ्या रंगाचा सुंदर ब्लाऊज घातला आहे. तिच्या या ब्लाऊजने तिचा हा लूक परिपूर्ण केला आहे. यासोबत तिने गळ्यात सुंदर नेकलेस आणि मॅचिंग असे कानातले घातले आहेत. केसांचा अंबाडा घालून कपाळी छोटीशी टिकली लावली आहे. या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (Sayali sanjeev share her beautiful saree look photo on social media)
तिचा हा सुंदर लूक तिच्या चाहत्यांना भुरळ घालत आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “बघावं आणि बघतच रहावं.” आणखी एका चाहत्याने “गोंडस,” अशी कमेंट केली आहे. आणखी एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “तुमचे हे घरी आले पुण्यामध्ये भेटलात का नाही?” आणखी एकाने लिहिले आहे की, “रोज रोज साडी, लग्नाची तयारी चालू आहे काय?” अजून एका चाहत्याने कमेंट केली आहे की, ”एकदा पिवळ्या रंगाची साडी घाला, ऋतुराज भाऊ खुश होतील.” तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव चालू आहे.
सायलीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ‘काहे दिया परदेस’ मालिकेत सायलीने गौरीची भूमिका साकारली होती. गौरीची भूमिका साकारत, अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्यानंतर अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीही पाऊल ठेवले.
तिने ‘पोलीस लाईन’, ‘आटपाडी नाईट्स’, ‘मन फकीरा’, ‘सातारचा सलमान’, ‘एबी आणि सीडी’, ‘झिम्मा’, ‘गोष्ट एका पैठणीची’ अशा मराठी चित्रपटामध्ये अभिनय करून रसिकांची मने जिंकली आहे. सायलीने कलर्स मराठीवरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत सुयश टिळकसोबत काम केले आहे. या मालिकेने नुकतेच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘तुरू तुरू चालू नको’, म्हणत शालूने शेअर केला तिचा अफलातून व्हिडिओ, तिच्या लूकने वेधले सर्वांचे लक्ष
-डीप नेक ड्रेसमधील मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकरचे फोटो व्हायरल, सर्वत्र रंगलीय तिच्या लूकची चर्चा
-श्रुती मराठेच्या साडीमधील फोटोचे चाहत्याकडून कौतुक, म्हणाला, ‘…तेव्हा आणखीनच भारी दिसते’