Sunday, June 8, 2025
Home हॉलीवूड ‘ऍव्हेंजर्स: एंडगेम’ फेम स्कारलेट जोहान्सनच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन; पतीने पोस्ट शेअर करत सांगितले नाव

‘ऍव्हेंजर्स: एंडगेम’ फेम स्कारलेट जोहान्सनच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन; पतीने पोस्ट शेअर करत सांगितले नाव

हॉलिवूड मधील सुप्रसिध्द अभिनेत्री स्कारलेट जोहान्सन आपल्या अनोख्या अभिनयासाठी चांगलीच चर्चेत असते. साल १९९४ मध्ये या अभिनेत्रीने अभिनयाची सुरुवात केली होती. ‘नॉर्थ’ हा तिचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटानंतर तिने हॉलिवूडमध्ये खास स्थान निर्माण केले. भारतातही तिचे अनेक चाहते आहेत. ‘ऍव्हेंजर्स: एंडगेम’ या चित्रपटातून तिला चांगलीच ओळख मिळाली. सध्या ‘ब्लॅक विडो’मुळे ती भलतीच चर्चेत आहे. आता तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे.

स्कारलेटने नुकतेच एका मुलाला जन्म दिला आहे. तिच्या पतीने ही माहिती त्यांच्या सोशल मीडियावर वरून दिली आहे. अभिनेत्री स्कारलेट जोहान्सनचा विवाह कॉमेडियन व अभिनेता कॉलिन जोस्ट यांच्यासह झाला होता. कॉलिन जोस्ट यांनी  या आधी स्कारलेट लवकरच आई होणार असल्याची माहिती दिली होती. आता तिने एका मुलाला जन्म दिला असून ते दोघे आई- बाबा झाले आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव त्यांनी ‘कॉस्मो’ असे ठेवले आहे. (Scarlett Johansson and her husband Colin jost welcomed a baby boy)

स्कारलेटचा हा दुसरा विवाह आहे. पहिल्यांदा तिने फ्रेंचमॅन यांच्याशी विवाह केला होता. त्यांना एक ६ वर्षांची मुलगी आहे. त्यांच्या घटस्फोटानंतर कॉलिन आणि स्कारलेट तीन वर्षे एकमेकांना डेट करत होते. अखेर २०२० मध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला व आता त्यांना एक मुलगा देखील आहे.

तिच्या पतीने बाळाची माहिती देताच स्कारलेटच्या अनेक चाहत्यांनी आनंद व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींना यावर विश्वासच बसत नव्हता. त्यातील एकाने कमेंटमध्ये असे लिहिले आहे की, “स्कारलेट दुसऱ्यांदा आई झाली? नाही तुम्ही मस्करी करत आहे.”

स्कारलेटने आतापर्यंत ‘ऍव्हेंजर्स’, ‘लूसी’, ‘कॅप्टन अमेरिका’, ‘घोस्ट इन द शेल’, ‘आयर्न मॅन २’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘वंडर वुमन’ गॅल गॅडोटने सेटवरून केले ब्रेस्ट मिल्क पंपचे फोटो शेअर; निभावतेय दुहेरी भूमिका

-आहा…कडकच ना! ऐश्वर्याने चुलत बहिणीच्या लग्नात लावले जोरदार ठुमके; अभिषेक अन् आराध्यानेही दिली साथ

-खेसारी लाल यादवचे ‘बिहार की तरह डूब जाएंगे’ गाणे रिलीझ; पाहा डान्स अन् मस्तीचा तडका

हे देखील वाचा