Monday, July 1, 2024

प्रेमासाठी कंगणाने ‘या’ अभिनेत्याचा मारही खाल्लाय? जाणून घ्या बॉलिवूडमधील ‘हे’ रंजक किस्से

अनेक जाणकार सांगतात बॉलिवूड हे स्वर्ग नाही नरक आहे. बॉलिवूडमध्ये घडणाऱ्या अनेक घटना आपण पाहत असतो. पण बॉलिवूडमध्ये दिसणारी ही रोषणाई अनेक तरुणांना भुरळ पडणारी असते. ‘दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं’ या म्हणीसाठी बॉलिवूड हे एक उत्तम उदाहरण ठरेल, असे मनोरंजन विश्वातीलच काही दिग्गज आणि जाणकार मंडळी सांगतात. वरवर ग्लॅमरस दिसणाऱ्या बॉलिवूडच्या पोटात खूपच रहस्य लपले आहेत, ज्याबद्दल लोकांना खूपच कमी माहिती आहे. चला तर बॉलिवूडमधील असेच दडलेले रहस्य जाणून घेऊया…

आमिर खान आणि जेसिका हायनस
आमिर खानचे अनेक किस्से आहेत, जे अनेक चाहत्यांना क्वचितच माहिती असतील, त्यातील एक आपण जाणून घेतोय. तर मंडळी ‘आती क्या खंडाला’ हे गाणं आमिरने ज्या सिनेमात गायलं होतं तो सिनेमा होता १९९८ साली आलेला ‘गुलाम.’ या सिनेमादरम्यान आमिर ब्रिटीश लेखिका जेसिका हायनसच्या खूपच जवळ आला होता. त्यांच्या मैत्रीची चर्चा सेटवरही होत होती. जेव्हा सिनेमाचं काम संपलं, तेव्हा असं म्हणलं जातं की, जेसिका गरोदर होती, आणि तिने एका मुलाला जन्म दिला. तसेच, तिच्या बाळाचा बाप हा आमिर खानच आहे, पण आमिर खानने हे खोटे असल्याचे सांगितले. याबद्दल खुद्द जेसिकाने दावा केला होता की, ती आणि आमिर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते आणि त्याच दरम्यान ती गरोदर राहिली. त्यानंतर आमिरने तिच्या मुलाला टाकून देण्यास आणि या नात्याबद्दल कोणालाही कळू देऊ नको सांगितले, पण तिलाही हे मान्य नव्हतं. नंतर ती लंडनला गेली आणि तिने मुलाला जन्म दिला.

ऋतिक रोशन आणि सुझेन खान
सर्वांनी ऋतिक रोशन आणि सुझेन खानच्या ब्रेकअपबद्दल ऐकलंच असेल. का नाही. शेवटी त्यांचा घटस्फोट हा जगातील सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एक होता. घटस्फोटासाठी सुझेनला तब्बल ३८० कोटी रुपये दिले होते. मात्र, तुम्हाला माहितीये का? यानंतर ऋतिक खूपच डिप्रेशनमध्ये गेला होता. धड तो त्याच्या ऍक्टिंगवर फोकस करू शकत होता, ना त्याच्या डान्सिंगवर किंवा मग इतर कोणत्या गोष्टीवर. या सर्वांमधून बाहेर येण्यासाठी चक्क पर्सनल कोचला नेमले होते. जो ऋतिकला त्याच्या घटस्फोटातून बाहेर पडण्यासाठी, ऍक्टिंगमध्ये, डान्सिंग आणि कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ऋतिकची मदत करायचा. असे म्हटले जाते की, ही ट्रेनिंग ऋतिकने खूप वर्षे घेतली होती. त्यासाठी त्याने या कोचला चांगले मानधनही दिले होते.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा
फिटनेस फ्रीक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिचा पती राज कुंद्रासोबत सुखी संसाराचा आनंद लुटत आहे. पण मंडळी, हे राज कुंद्राचं दुसरं लग्न आहे. त्याच्या पहिल्या बायकोने शिल्पा शेट्टीवर राज कुंद्राला आपल्या जाळ्यात अडकवल्याचा आरोप केला होता. इतकंच नाही, तर तिने त्यांचं लग्न मोडल्याचाही आरोप शिल्पावर केला होता. तिने सांगितले होते की, जेव्हा राज कुंद्रा शिल्पाला पहिल्यांदा भेटल्यानंतर तो घरी येऊन वेगळाच व्यवहार करत होता. त्यामुळेच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर राज कुंद्राने शिल्पा शेट्टीसोबत लग्नाची गाठ बांधली. पण शिल्पाने तर असे सांगितले होते की, ती जेव्हा राज कुंद्राला भेटली, तेव्हा त्यांचा आधीच घटस्फोट झाला होता.

कंगना रणौत आणि आदित्य पंचोली
सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौत जेव्हा बॉलिवूडमध्ये आली होती, तेव्हा तिला खूपच कष्ट करावं लागलं होतं. त्यानंतर ती अभिनेता आदित्य पंचोलीला भेटली. आदित्यला भेटल्यानंतर कंगना आणि त्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरही सुरू झालं होतं. असं म्हटलं जातं की, आदित्य पंचोली तिच्यावर हातही उचलायचा, पण कंगना त्याला काहीच बोलत नव्हती. कारण ती बॉलिवूडमध्ये नवीन होती. तिला बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमवायचं होतं. असंच काहीसं तिचं ऋतिक रोशनबरोबरही झालं होतं. त्यांचा वाद तर थेट कोर्टापर्यंत पोहोचला होता.

सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस
जॅकलिनने २००९ साली आलेल्या ‘अलादिन’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण ४ वर्षांनंतर ती सुपरस्टार सलमान खानच्या ‘किक’ या सिनेमात दिसली होती. हा सिनेमा ब्लॉकबस्टर झाला होता. सलमानसोबत किकमध्ये काम केल्यानंतर जॅकलिनच्या यशाचा आलेख अजून उंचीवर गेला. बॉलिवूडमध्ये तिचा गॉडफादर म्हणून सलमान खानचं नाव घेतलं जातं. असं म्हणलं जातं की, सलमानने मुंबईत एक ३ कोटींचा फ्लॅट विकत घेतला होता. हा फ्लॅट सलमानने जॅकलिनला गिफ्ट केला होता. असंही म्हणलं जातं की, सलमान आणि जॅकलिन त्यावेळी रिलेशनशिपमध्ये होते, आणि जॅकलिन सलमानच्या पनवेलमधल्या फार्महाऊसवरही दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा