हिंदी सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचं नाव बॉलिवूड अभिनेत्यांसोबत जोडलं गेलंय. पण जर तुम्हाला असं सांगितलं की, एका अभिनेत्रीचं नाव चक्क तिच्या भावासोबत जोडलं गेलं होतं. हे ऐकून तुम्हालाही शॉक बसला असेल ना. आता मंडळी तुम्हीच विचार करा, हे ऐकून त्या अभिनेत्रीला कसं वाटलं असेल. ती अभिनेत्री इतर कोणी नाही, तर ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्याने सर्वांच्याच हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजेच रवीना टंडन. रवीनाला जेव्हा समजलं की, तिच्या भावासोबत तिचं नाव जोडले गेलंय, तेव्हा तिचं काय हाल झालं होतं ते आपण जाणून घेऊया…
रवीना टंडनचं (Raveena Tandon) नाव 90 च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत अव्वल क्रमांकावर येते. तिने अनेक सुपरहिट सिनेमात सुपरहिट कलाकारांसोबत कााम केलंय. यादरम्याान तिचं नाव अनेक कलाकारांसोबत जोडलं गेलं होतं, पण तिचं नाव जेव्हा तिच्या भावासोबत जोडलं गेलं, तेव्हा तिच्यावर मोठा आघातच झाला होता.
एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीनं सांगितलं होतं की, कशाप्रकारे एकदा मीडियाने तिचे नाव तिच्या भावाच्या नावाशी जोडले होते आणि त्यामुळे तिची रात्रीची झोप उडाली होती आणि ती खूप टेन्शनमध्ये आलेली. तिने सांगितलं होतं, “मला आठवतं की, मी रात्री झोपूच शकले नव्हते. झोपण्यासाठी रडायचे. मला नेहमी भीती वाटायची की, दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातले लोक माझ्याबद्दल काय लिहितील. त्यांनी माझी आणि माझ्या कुटुंबाची इज्जत घालवली होती.”
याविषयी सांगताना ती म्हणाली होती की, “खरे तर एकदा त्यांनी माझं नाव माझ्या भावाच्या नावाशी जोडले होते आणि ‘स्टारडस्ट’ मासिकानेही नेमकी हीच बातमी छापली होती. त्यांनी लिहिलेलं की, ‘रवीनाला सोडण्यासाठी एक देखणा, गोरा गोमटा मुलगा दररोज येतो आणि तो तिचा बॉयफ्रेंड आहे, आम्ही सगळं माहिती करून घेतलंय.” पण तो तर माझा भाऊ होता.”
त्याकाळा कशाप्रकारे सर्व कलाकारांना मीडियावर अवलंबून राहावं लागायचं, हेही तिनं बोलून दाखवलं. त्यामुळं ती या सर्वांचं स्पष्टीकरण देण्याचं टाळायची. ती म्हणाली की, “आम्हाला याच गॉसिप्ससोबत जगावं लागायचं. कारण तुम्ही या सर्वांबद्दल किती स्पष्टीकरण देणार ना. त्यावेळी तुम्ही त्या पत्रकार आणि संपादकांच्या दयेवर पोटापाण्याचा प्रश्न मिटायचा. जर तुम्ही त्यांच्याबद्दल काही बोललात, तर ते या गोष्टीही मसाला लावून सांगायचे.”
अशाप्रकारे रवीनाला या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागला होता. आता तिच्या भावाचा विषय निघालाच आहे, तर त्याच्याविषयी जाणून घेतलंच पाहिजे ना, तर रवीनाच्या भावाचं नाव आहे राजीव टंडन. राजीवही सिनेमात झळकला होता. त्यानं 1985 साली आलेल्या ‘एक मैं और एक तू’ या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. राजीवचं लग्न 2004 साली अभिनेत्री राखी विजानसोबत लग्न केलं होतं. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. त्यांनी 2010 साली वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना मुलबाळही नाहीये. विशेष म्हणजे राखीने अनेक टीव्ही मालिका आणि बॉलिवूड सिनेमात काम केलं होतं. त्यात ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘थँक्यू’ आणि ‘क्रिश ३’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.
आता रवीनाच्या वैयक्तित आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर तिने 22फेब्रुवारी,2004ला उदयपूरच्या जग मंदिर पॅलेसमध्ये अनिल थडानीसोबत पंजाबी रीतीरिवाजानुसार लग्नगाठ बांधली होती. दोघांनाही 4 मुलांचे आई-बाबा आहेत. यापैकी मुलगा रणबीर आणि एक मुलगी राशाचे ते बायोलॉजिकल पालक आहेत, तर छाया आणि पूजा या दोन मुलींना तिने दत्तक घेतलंय. या दोन मुलींना रवीनाने वयाच्या 21 व्या वर्षी दत्तक घेतले होते.
हेही वाचा –
–लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ‘या’ चित्रपटात केले होते 1 रुपयात काम, वाचा संपूर्ण कहाणी
–निवेदिता सराफ यांना आली लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आवडत्या डिशची आठवण, सांगितली खास गोष्ट