गायक आतिफ असलम हा पाकिस्तानमधील एक प्रसिद्ध गायक आहे. तो पाकिस्तानमध्ये लोकप्रिय आहेच, परंतु भारतात देखील त्याची लोकप्रियता भरपूर आहे. त्याची गाणी भारतात देखील खूप प्रसिद्ध आहेत. आतिफ हा एक उत्कृष्ट गायका तर आहेच, पण त्याच्या लूकची देखील सर्वत्र चर्चा असते. तो एक हँडसम गायक आहे. याच कारणाने तो जेव्हा बॉलिवूडमध्ये आला होता, तेव्हा लाखो मुली त्याच्यावर फिदा होत्या. परंतु त्याच्या मनात सारा भरवाना ही होती.
त्या दोघांनी 2010 साली लग्न केले आहे. त्यामुळे अनेक तरुणींचे हृदय तुटले होते. परंतु त्याचे चाहते तर तेव्हा खूप हैराण झाले होते, जेव्हा त्यांनी आतिफ असलमच्या पत्नीला पाहिले होते. (See the beautiful photos of atif aslam’s wife)
आतिफ असलमची पत्नी सारा ही खूपच सुंदर आहे. तिची सुंदरता कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीये. साराला पाहून अनेक लोक तिच्या सौंदर्याचे दीवाने झाले होते. लग्नाच्या आधी आतिफ आणि सारा जवळपास सात वर्ष रिलेशनमध्ये होते. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, सारा खूपच ग्लॅमरस दिसत आहे. एका मुलाखतीत आतिफने सारा ही त्याच्यासाठी खूप लकी आहे, असे देखील सांगितले होते. आतिफ आणि साराला दोन मुलं आहेत. ज्यांच्यासोबत ते दोघे आनंदाने वेळ घालवत असतात.
गायक आतिफ असलम याने 2005 मध्ये आलेल्या ‘जहर’ या चित्रपटात ‘वो लम्हे’ हे गाणे गायले होते. या गाण्याने त्याला रातोरात लोकप्रियता मिळाली होती. या गाण्यासाठी त्याला सर्वोत्तम पार्श्वगायकासाठी आयफा पुरस्कार देखील मिळाला होता. 12 मार्च, 1983 रोजी पाकिस्तानमध्ये जन्म झालेला आतिफ हा 39 वर्षाचा आहे.
आतिफने बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. यात ‘पहेली नजर ने कैसा जादू कर दिया’, ‘तू जाने ना’, ‘तेरे संग यारा’, ‘जीना जीना’, ‘दिल दिया गल्ला’, ‘पिया ओ रे पिया’, ‘तेरा होने लगा हूँ’, ‘ओ साथी’ ही सुपरहिट गाणी गायली आहेत. त्याच्या गाण्यांना संगीतप्रेमी खूप प्रेम दर्शवतात.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील ‘या’ अभिनेत्रीने 32 व्या वर्षी एग्स फ्रीज करत घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या यामागचे कारण
‘तारक मेहता…’ फेम ‘शैलेश लोढा’ यांनी एक पोस्ट शेअर करत म्हणाले, ‘अब जंग तो होगी…’