Friday, March 29, 2024

आलिया भट्टसह ‘या’ कलाकारांचा झालाय परदेशात जन्म, पण भारतात मिळवलीय संपत्ती आणि प्रसिद्धी

आलिया भट्टच्या (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर सगळेच आलियाच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की, बॉलिवूडमध्ये काम केलेल्या आलियाचा जन्म भारतात नसून परदेशात झाला आहे. आश्चर्य वाटलं ना? खरे तर आलियाचा जन्म लंडनमध्ये झाला होता. ती लंडनची नागरिक आहे. तिच्या आईकडेही ब्रिटिश नागरिकत्व आहे. त्याचप्रमाणे या अभिनेत्रीप्रमाणेच बॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार आहेत, ज्यांचा जन्म परदेशात झाला आहे. चला तर मग या कलाकारांबद्दल जाणून घेऊया.

दीपिका पदुकोण (Deepika Padukone)
दीपिका पदुकोणची गणना बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. आलिया भट्टप्रमाणेच तिचाही जन्म परदेशात झाला आहे. दीपिकाचा जन्म डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे झाला. दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण ही भारतातील प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आहेत. अभिनेत्रीच्या जन्माच्या वेळी तिचे वडील विस्तृत प्रशिक्षण कार्यक्रमामुळे डॅनिश शहरात होते.

सारा जेन डायस (Sarah Jane Dias)
मिस इंडिया बनलेल्या सारा जेन डायसचाही जन्म भारताबाहेर ओमानच्या मस्कत शहरात झाला होता. ती ‘गेम’ आणि ‘क्या सुपरकूल हैं हम’मध्ये दिसली आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकले नाहीत.

इमरान खान (Imraan Khan)
इमरान खान याचा जन्म अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील कॅपिटल मॅडिसन येथे झाला. माध्यमांतील वृत्तानुसार, इमरान त्याच्या आई-वडिलांपासून वेगळा झाल्यानंतर भारतात परतला आहे. इमरान हा बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानचा भाचा आहे. आमिरने आपल्या भाच्याला त्याच्याच प्रोडक्शन हाऊसमध्ये बनवलेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत लॉन्च केले.

आलिया भट्ट
आलिया भट्टचा जन्म युनायटेड किंगडममध्ये झाला. तिने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ‘हायवे’ आणि ‘उडता पंजाब’मधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. अलीकडेच ती संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटानंतर आलिया लवकरच ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे.

कॅटरिना कैफ (Katrina Kaif)
आलियाप्रमाणेच कॅटरिना कैफही ब्रिटिश नागरिक आहे. तिचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला. अभिनेत्रीचे पालकही ब्रिटिश नागरिक आहेत.

एमी जॅक्सन (Amy Jackson)
बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी एमी जॅक्सन एक यशस्वी मॉडेल आहे. ब्रिटिश वंशाची ही अभिनेत्री अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसली आहे. ‘सिंग इज ब्लिंग’ हा तिच्या कारकिर्दीतील संस्मरणीय चित्रपटांपैकी एक आहे.

मोनिका डोगरा (Monika Dogra)
अभिनेत्री मोनिका डोगराचा जन्म अमेरिकेत झाला. बाल्टिमोर, मेरीलँड येथे जन्मलेली ही अभिनेत्री आमिर खान अभिनित ‘धोबी घाट’ या चित्रपटात दिसली आहे.

सनी लिओनी (Sunny Leone)
बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या सनी लिओनीचा जन्म कॅनडात झाला. अभिनय कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी तिने मॉडेलिंगच्या जगात नशीब आजमावले.(these bollywood stars including alia bhatt and katrina kaif were born abroad see he list here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शहनाज गिल असे काय म्हणाली की, दुसऱ्यांना हसवणाऱ्या कपिल शर्माला देखील हसणे झाले अनावर

‘आरआरआर’ने ऑस्कर जिंकल्याचा आनंदात भारतीच्या मुलाने केला जल्लाेश, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा