भारतीय बॉलीवूड चित्रपटसृष्टीमध्ये आणि चित्रपट गाजले त्याचे सिक्वेल सुद्धा आले आहे. आज काल अनेक चित्रपटांचे सिक्वेल येत आहेत. धुरंधर 2, बॉर्डर टू, आला तर खलनायक या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. आणि आता दिग्दर्शक सुभाष घई यांनीही त्यांच्या सुपरहिट चित्रपट ‘ताल’च्या सिक्वेलची घोषणा केली आहे. तर तर , सुभाष घई यांनी इन्स्टाग्रामवर अक्षय खन्ना आणि अनिल कपूर यांच्या ‘ताल’ चित्रपटाचा एक फोटो शेअर केला होता. त्यासोबत त्यांनी लिहिले, जर ताल 2 बनवला तर आवडेल का? आणि ती पुन्हा तितकीच अविस्मरणीय ठरू शकेल का? हे प्रश्न माझ्या मनात आहेत. असे त्यांनी या पोस्ट
ताल हा चित्रपट चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय चित्रपट आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती त्यामुळेच सुभाष घई यांनी एका मुलाखतीत म्हणले की, मी माझ्या पोस्टमध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकच देतील. गेल्या 15 वर्षांपासून लोक मला विचारत आहेत की मी ‘ताल’ पुन्हा कधी बनवणार. तर ते पुढे म्हणाले त्यावेळी ‘ताल’ बनवला गेला, तेव्हा अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या राय बच्चन नवोदित होते, तर अनिल कपूर एक स्टार म्हणून ओळखले जात होते तर योग्य कलाकार आणि आणि कथा या दोन्हीची उत्तम प्रकल्पासाठी गरज असते.
‘ताल’ (taal)हा चित्रपट 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता. तर या चित्रपटाने त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली. आणि आज हि या चित्रपटाला प्रेक्षक विसरले नाहीत. त्यातील कथा, गाणी , आणि कलाकारांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. आता ‘ताल 2’ बद्दल चर्चा वाढत असल्याने, चाहत्यांना आशा आहे की हा सिक्वेल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करेल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










