Monday, July 1, 2024

‘मास्क घाला, मला पुन्हा थाळी वाजवायची नाहीये!’ पाहा तर काय म्हणतेय ‘भाईजान’ची मुन्नी

सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट प्रेक्षकांकडून खूप पसंत केला गेला होता. यातील ‘मुन्नी’ अर्थातच हर्षाली मल्होत्राने, आपल्या निरागस अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने चोरली. हर्षाली सध्या तिच्या व्हिडिओमुळे बरीच चर्चेत आहे. इतकेच नाही तर तिच्या डान्सचे व्हिडिओ पोस्ट होताच, सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागतात. चाहत्यांसह सेलेब्रीटींनाही तिचे व्हिडिओ खूप आवडतात. सोशल मीडियावर हर्षाली मल्होत्राची फॅन फॉलोइंग तगडी आहे. आता हर्षालीचा लेटेस्ट व्हिडिओ समोर आला असून, चाहत्यांनीही याला खूप पसंती दिली आहे.

नुकताच हर्षालीने शेअर केलेल्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओमध्ये ती मास्कबद्दल बोलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणते, “कृपया मास्क घाला कारण, मला पुन्हा थाळी नाही वाजवायची”. ती पुढे म्हणाली की, “माझा तर मेकअपसुद्धा दिसत नाही, तरीही मी मास्क घालते, तेही प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी.”

हर्षाली मल्होत्राच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून जोरदार प्रतिक्रिया येत आहे. एका युजरने लिहिले आहे, “अपकमिंग हिरोईन.” तर दुसर्‍या युजरने हर्षालीला “ब्युटीफुल” म्हटले आहे. इतकेच नाही तर एका चाहत्याने म्हटले आहे की, ती अगदी बाहुलीसारखी दिसत आहे. चाहते ज्या पद्धतीने हर्षालीवर प्रेम व्यक्त करत आहेत, हे पाहून असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की, हर्षलीला तिच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटामुळे इतकी लोकप्रियता मिळाली आहे.

यापूर्वी सलमान खानच्या नुकत्याच रिलीझ झालेल्या ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ चित्रपटाच्या ‘सीटी मार’ गाण्यावर हर्षाली डान्स करताना दिसली होती. तिच्या या डान्स व्हिडिओलाही चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दु:खद बातमी! ‘आरारारा…खतरनाक’ फेम गीतकार प्रणित कुलकर्णी यांचे निधन

-व्यसनाच्या आहारी गेल्याने अक्षरशः उद्ध्वस्त झाले होते ‘हे’ कलाकार, काही नावे वाचून धक्का बसेल

-खऱ्या प्रेमाच्या शोधात ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीने केली चार लग्न, आता आयुष्यात आलंय…

हे देखील वाचा