Wednesday, July 2, 2025
Home कॅलेंडर “अजून वाजवा…” जेव्हा चिमुकल्या तैमूर समोर वाजतं त्याच्याच बापाचं गाणं… पाहा मजेशीर व्हिडिओ!

“अजून वाजवा…” जेव्हा चिमुकल्या तैमूर समोर वाजतं त्याच्याच बापाचं गाणं… पाहा मजेशीर व्हिडिओ!

बॉलिवूडमधील सर्वात चर्चित स्टार कीड आजमितीला कोण आहे असा प्रश्न विचारला गेला तर हमखास प्रत्येकाच्या तोंडून तैमुरचं नाव निघेल. सैफ अली खानच्या घरासमोर नेहमी फोटोग्राफर्सची रेलचेल असते. जशी तैमुरची एक जरी झलक दिसली की काढले फोटो!

काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा तैमुर चर्चेत आला आहे. त्याच्या घरासमोर काही गोमाता सेवक आल्यानंतर ते त्याच्यासमोर सैफ अली खानच्या चित्रपटातील गाणी वाजवतात आणि आणि तैमुर सुद्धा त्यांना चांगला प्रतिसाद देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी करीना आणि सैफच्या घरासमोर काही गोमाता सेवक गेले होते. त्यांना पाहून तैमुर खाली आला. तैमुर ला पाहून त्यांनी हम साथ साथ है चित्रपटातील ये तो सच है की भगवान है गाणं पिपाणीवर वाजवायला सुरुवात केली.

काही क्षणातच त्यांनी सैफच्या दिललगी चित्रपटातील ‘जब भी कोई लडकी देखूँ मेरा दिल दीवाना बोले ओले ओले ओले ओले ओले ओले’ हे गाणं वाजवायला सुरुवात केली. पण मध्येच तैमुरने थांबण्याचा इशारा केला त्यावेळी त्यांनी गाणं वाजवणं थांबवलं. परंतु, तैमुर ने फोटोग्राफर्सना थांबण्याचा इशारा केला होता.

त्यानंतर तैमुरने त्या गोमाता सेवकांना ‘और बजाओ’ म्हणत त्यांना पुन्हा गाणी वाजवायला सांगितली. इथं गोसेवकांचं प्रसंगावधान पण वाखाणण्यासारखं आहे कारण त्यांना जरी हे माहीत असलं की हे सैफ अली खानचं घर आहे तरीही त्याच्या मुलासमोर त्याच्याच चित्रपटातली सुप्रसिद्ध गाणी वाजवणं हे प्रसंगावधान कौतुकास्पद आहे.

तैमुर त्याच्या वडिलांची गाणी एन्जॉय करताना आपल्या या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. शिवाय तैमुर सध्या चार वर्षांचा असून तो लवकरच बिग ब्रदर देखील होणार आहे.

अर्थात आपल्याला ठाऊक असेलच की करीना पुन्हा एकदा गर्भवती राहिली आहे. फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात करीना तिच्या दुसऱ्या अपत्याला जन्म देऊ शकते.

हे देखील वाचा